जालना : वडीगोद्री येथे मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरा-समोर

दोन्ही उपोषण स्थळी अतिरिक्त पोलिस फौजफाटा तैनात
Maratha and OBC protesters face off
मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरा-समोरpudhari Photo
Published on
Updated on

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा :

अंबड तालुक्यातील वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर आले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे वडीगोद्री इथे उपोषणाला बसले आहेत. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. अंतरवली सराटी गावाकडे जाणाऱ्या फाट्यावर वडीगोद्री या गावात मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर आले. दोन्ही बाजूच्या आंदोलकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली.

Maratha and OBC protesters face off
जालना: मराठा आंदोलक शहागडमार्गे बीड जिल्ह्यात प्रवेश करणार; पोलीस बंदोबस्त तैनात

मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी (दि.20) प्रकृती बिघडल्याने मराठा समाजाचे अनेक आंदोलक अंतरवली सराटीत दाखल होत आहेत. अंतरवली सराटीत जाण्यासाठी लक्ष्मण हाके यांचं जिथे उपोषण सुरु आहे, तिथूनच रस्ता जातो. त्यामुळे त्या रस्त्याने मराठा आंदोलकांच्या गाड्या जात आहेत. यामुळे दोन्ही समाजाच्या आंदोलकांमध्ये तिथे घोषणाबाजी होताना दिसत आहे. असं असताना पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केला जात आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल आहे.

Maratha and OBC protesters face off
जालना : घनसावंगी तालुक्यात मराठा आंदोलक आक्रमक; भाजप कार्यालयावर दगडफेक

वडीगोद्री येथून मनोज जरांगे यांच्या आंदोलकांच्या दिशेला गाड्या जात होत्या. त्याच दरम्यान आमच्या गाड्या सोडत नाहीत आणि त्यांच्या गाड्या का सोडतात? या मुद्द्यावरुन ओबीसी आणि मराठा आंदोलक समोरासमोर आले. प्रा.लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे यांच्या दोघांचे उपोषस्थळ जवळ-जवळ सुरु आहे. त्यामुळे दोन्ही समाजाचे आंदोलक तिथे जमत आहेत. अनेक वेळा कार्यकर्ते आमनेसामने येत आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. हजारो पोलिसांचा बंदोबस्त संपूर्ण परिसरात लागलेला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news