illegal sand mining : पाठलाग करून वाळूचा टेम्पो पकडला

पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन जोरात
Mantha illegal sand mining
तळणी ः मंठा तालुक्यातील बेलोरा चौफुली येथे पाठलाग करून पकडलेल्या अवैध वाळूच्या टेम्पोसह तहसीलदार सुमन मोरे व इतर.pudhari photo
Published on
Updated on

तळणी ः मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उत्खननासंदर्भात मंगळवारी तहसीलदार सुमन मोरे यांनी काही ठिकाणी अवैध वाळू वाहतुकीच्या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार मोरे या येत असल्याचे पाहताच टेम्पो चालकाने टेम्पोसह पूर्णा नदीपात्रातून धूम ठोकली होती.

या टेम्पोचा पाठलाग करून तहसीलदार मोरे यांनी बेलोरा चौफुलीजवळ पकडला. यावेळी टेम्पो चालकाने हायड्रोलिक करून वाळू खाली रिचवण्याचा देण्याचा प्रयत्न केला.

Mantha illegal sand mining
illegal sand mining : पूर्णा नदीपात्रातील अवैध वाळू उपशाविरोधात अर्धनग्न आंदोलन

मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून दहा ते अकरा ठिकाणांहून अवैध वाळू उत्खनन सुरू असून त्यांच्यावर ठोस कारवाई होणे गरजेचे आहे. ज्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये हा अवैध वाळू उपसा होतो. त्या ग्रामपंचायतीवर महसूल नियमानुसार बोजा टाकण्यात यावा जेणेकरून अवैध वाळू वाहतुकीला थोड्या प्रमाणात का होईना लगाम लागणार आहे.

Mantha illegal sand mining
Pune River Filling Issue: भिडे पूल परिसरात मेट्रो कामावरून वाद; नदीत भराव टाकल्याने पूराचा धोका

ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या गौण खनिजाचे संरक्षण करणे हे ग्रामपंचायतीचे कर्तव्य असतानासुद्धा पूर्णा नदीकाठावरील अनेक ग्रामपंचायती या वाळू चोरांना एक प्रकारे छुपी मदत करत असल्याचा प्रकार समोर येत आहे.

टेम्पोला दंड

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाया सुरू आहेत. वाळू चोरांचे खबरे नेहमी पाळत ठेवत असल्याने कारवाया करण्यात अडचणी येत आहे या टेम्पोवर सव्वा लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे मंठा तहसीलदार सुमन मोरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news