मनोज जरांगे समर्थकांनी धुळे - सोलापूर महामार्ग रोखला

Manoj Jarange | रामगव्हाण फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन
Dhule Solapur highway blocked
रामगव्हाण फाट्याजवळ मनोज जरांगे समर्थकांनी धुळे - सोलापूर महामार्ग रोखलाPudhari Photo
Published on
Updated on

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे -पाटील यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत.उपोषणाला सातवा दिवस झाला तरीही दखल घेतली जात नसल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. जरांगे समर्थकांनी धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आज (दि.२३) रोखला. हजारो आंदोलकांनी महामार्गवरील रामगव्हाण फाट्याजवळ एक तास रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली.

वडीगोद्री -अंतरवाली रस्ता वाहतुकीसाठी खुला करा - आंदोलकांची मागणी

मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. तब्बल एक तास मराठा समाजाकडून हे आंदोलन करण्यात आले.वडीगोद्री येथून अंतरवालीकडे जाणारा बंद करण्यात आलेला रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी आंदोलकानी यावेळी केली. या आंदोलनामुळे तब्बल एक तास धुळे- सोलापूर महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

Dhule Solapur highway blocked
मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news