मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको

जालना रोडवरील केंब्रिज चौक अर्धा तास रोकला ; आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
Stop the road from the entire Maratha community in support of Manoj Jarange at Jalna
मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाकडून रास्ता रोकोFile Photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ आज (रविवार) (दि.२२) सकाळी साडेदहा वाजता केंब्रिज चौकात (जिजाऊ चौकात) रास्ता रोको करण्यात आला. यावेळी साडेदहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान आंदोलकांनी जालन्याकडे जाणारा रस्ता अडवून ठेवल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या रांगा वाढत चालल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना, ताब्यात घेवून रास्ता रोको थांबविला. जरांगे यांचे मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाकडून हा रास्ता रोको करण्यात आला.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, सगे-सोयरे कायदा पारित करा, अशा मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी गेल्या एक वर्षांपासून जरांगे यांचा लढा सुरू आहे. जरांगे यांनी राज्य सरकारला सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदत दिली होती. परंतु, सरकारने जरांगे यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे, ते पुन्हा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणाला ६ दिवस झाले आहेत. जरांगे यांची तब्येत खालावत चालली आहे. परंतु, राज्य सरकारने अद्याप उपोषणाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे सकल मराठा समाजाकडून हा रास्ता रोको करण्यात आला. यावेळी सुरेश वाकडे, सुनील कोटकर, नितीन देशमुख, सतीश वेताळ, दिनेश शिंदे, रवींद्र वाहटूळे अशोक वाघ, दिपाली मिसाळ यांसह आदी शेकडो समाज बांधवांची उपस्थिती होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news