

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आणि त्याबाबतच्या अनेक मागण्या मान्य कराव्यात यासाठी आता पुन्हा एकदा आमरण उपषणाचे हत्यार उपसण्याची घोषणा केली आहे. येत्या ३० मे पासून ते अंतरवाली सराटीमध्ये आपले आमरण उपोषण सुरू करणार आहेत. त्यांनी प्रचंड उष्णता असतानाही उपोषणाची हाक दिल्यानं त्यांच्या जीवाला मोठा धोका देखील आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने काढलेला जीआर का रद्द केला असा सवाल करत आता आरपारचे खेटायचे आहे असे सांगितलं.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, 'आम्हाला आरक्षण असूनही तुम्ही आरक्षण देत नाही. तुम्हाला खेटायचे आहे तर मग खेटाच तुम्हाला ३० तारखेला खेटू.' याचबरोबर जरांगेंनी भाजप सरकार अजितदाद आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांना टार्गेट करत असल्याचा देखील दावा केला.
तसेच त्यांनी देवेंद्र फडणवीस हे १०० टक्के आरक्षण देतील असं आम्हाला बोलताना संभ्रम निर्माण केला. हा डाव होता. आता तरी किमान प्रसाद लाड यांचे डोळे उघडतील. ते म्हणाले की ते मराठा आहेत. त्यामुळं प्रसाद लाड यांचे डोळे उघडतील. सरकारमध्ये मराठ्यांविषयी द्वेष ठासून भरला आहे असा आरोप देखील जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेवेळी केला. तसेच त्यांनी अजूनही देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांची मने जिंकण्याची संधी आहे असं देखील वक्तव्य केलं.
मनोज जरांगे पाटील यांनी ३० मे रोजी मी आमरण उपोषणाला बसणार आहे. त्यात कोणताही बदल नाही असं ठणकावून सांगितलं. तसेच त्यांनी मी माझे प्राण टेकायला तयार आहे. मी तुमच्या मलांसाठी जीव देखील द्यायला तयार आहे. मला चर्चा नको मागण्यांची अंमलबजावणी द्या असे आवाहन देखील केलं.
तसेच त्यांनी अंतरवाली सराटीत मला मानणारे लोकं येतील. मात्र त्यांनी येऊ नये असे देखील आवाहन ते करायला विसरले नाहीत. मराठा समाजाने दिलेल्या योगदानाबद्दल बोलताना जरांगे पाटील म्हणाले, लोकांचे लेकरं समाधानी रहावे म्हणून आमच्या वंशजांनी काय नाही दिलं? आम्ही आजही लढण्याची क्षमता ठेवतो, संघर्ष करण्याची क्षमता ठेवतो. लोकांच्या उरलेल्या पीठावर जगणारे आम्ही नाही. आम्ही सगळ्या समाजांना भरभरून दिलं. तुम्ही तोडण्याची सुरूवात करा आम्ही शेवट करतो असा इशारा देखील त्यांनी दिला.
तुम्ही सांगितलं वेळ लागतो तर १० महिन्यांचा वेळ दिला. तुम्ही म्हणता आपल्या जातीचा मुख्यमंत्री नसून त्यांनी आरक्षण दिलं. ही त्यांची भाषा असते. तो आपल्या जातीचा नसून त्याने मराठ्यांनी मुख्यमंत्री केलं. प्रसाद लाड यांचा राजीनामा नको. आपलाच माणूस चुकीचा आहे हे त्यांना कळालं म्हणजे खूप झालं असं म्हणत जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांचा देखील समाचार घेतला. जरांगे पाटील यांनी मी ३० तारखेला असाच उठून उन्हात बसणार असा इशाला देखील दिला. तसेच जर उष्माघाताने माझा मृत्यू झाला तर त्याला सरकार जबाबदार असल्याचं देखील सांगून टाकलं.