Manoj Jarange Patil Mumbai March: मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिटनेमध्येही पडसाद; एकनाथ शिंदेंनीही दिली प्रतिक्रिया

Manoj Jarange Patil Mumbai March
Manoj Jarange Patil Mumbai Marchpudhari
Published on: 
Updated on: 

एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया 

एकनाथ शिंदे यांनी जरांगेवर समाज हिताली लाईन असावी राजकीय हिताची लाईन नसावी अशी अप्रत्यक्ष टीका केली.

जरांगेंच्या भाषेवर कॅबिनेटमध्येही पडसाद 

जरांगे पाटील हे टीका करताना जी भाषा वापरतात त्यावर कॅबिनेटमध्ये देखील पडसाद उमटले असून जरांगेंची भाषा अयोग्यच असल्याचं मत मांडलं गेलं. सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यावरून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

मराठ्यांचे मुंबईकडे कूच 

मनोज जरांगे पाटील यांनी सध्या मी पुढे जातो माझ्यासोबत कोणी येऊ नका असे आवाहन मराठा बांधवांना केलं होतं. मात्र मराठा बांधवांनी जरांगे पाटील यांच्या गाडीभोवती मोठी गर्दी केली असून गाडीचा वेग मंदच आहे. तसेच रस्त्यावर देखील मराठा बांधव गाडी घेऊन जरांगे पाटील यांची वाट पाहत आहेत.

पुढारीला दिली प्रतिक्रिया

मनोज जरांगे पाटील यांनी गाडीतून जात असताना पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली. त्यांनी मी आमच्या लेकरा बाळांसाठी लढणार आहे. माझा जीव गेला तरी चालेल मात्र मी आरक्षण मिळवूनच गप्प बसणार आहे असं सांगितलं. मी बोलवतो त्यावेळी समाज बांधवांनी या असं देखील ते म्हणाले.

मनोज जरांगेंचे महिलांकडून औक्षण 

मुंबईकडे कूच करण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी मधील महिलांनी औक्षण केलं आहे. त्यानंतर त्यांना कार्यकर्त्यांनी हाताला धरून गाडीत बसवले.

सरकारसोबत कुठंही चर्चा 

मनोज जरांगे पाटील हे जरी मुंबईकडे निघाले असले तरी त्यांनी सरकारनं कुठंही चर्चेला यावं असं सांगत या पाच दिवसाच्या प्रवासात कधीही यावर तोडगा काढला जाऊ शकतो असे सूतोवाच देखील त्यांनी दिले.

अठराव्या दिवशीही उपोषण सुरू 

मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण आंदोलन १८ व्या दिवशी देखील सुरू ठेवलं आहे. अशातच ते मुंबईकडे कूच करणार आहेत.

मनोज जरांगे यांच्या तिसऱ्या परवानगी अर्जावर अद्याप निर्णय नाही

मनोज जरांगे यांच्याकडून आंदोलनाच्या परवानगीसाठी तिसरा अर्ज परवानगी अर्ज करण्यात आला आहे. मात्र अद्याप त्याच्यावर कोणता निर्णय झालेला नाही. यापूर्वी केलेले दोन अर्ज पोलिसांनी लागेच फेटाळले होते मात्र या अर्जावर विचारविनिमय सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळी ११ वाजता जालना सोडणार 

मनोज जरांगे पाटील हे सकाळी ११ वाजता अंतवाली सराटीमधू मुंबईकडे कूच करणार आहेत. त्यांच्या पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

ताफ्यात फक्त ४ गाड्या 

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना माझ्या सोबत येऊ नका असा सल्ला दिला असून ते जालना येथून फक्त ४ गाड्यांच्या ताफ्यासह निघणार आहेत.

जरांगे पाटील मुंबईकडे होणार कूच

Manoj Jarange Patil Mumbai March Live: मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्या घेऊन आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज मुंबईकडे केली आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना त्यांनी माझ्यासोबत येऊ नये अशी सूचना केली आहे.

निघण्यापूर्वी पुढारीशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी मी लेकराबाळांसाठी लढतो आहे. मला माझ्या जीवाची परवा नाही. त्यांच्यासाठी मी मरायला देखील तयार आहे अशी प्रतिक्रिया दिली. त्यांनी मी बोलवेन त्यावेळी या असं देखील सांगितलं. जरांगे पाटील हे गेल्या १८ दिवसांपासून उपोषणावर आहेत. त्यांचा आवाज खोल गेला असून प्रकृती देखील नाजूकच आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत देखील वाढ केली आहे. पोलीस विभागाची विशेष सुरक्षा असणार आहे. अंतरवाली ते मुंबईपर्यंत जरांगेंना विशेष सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news