जरांगेंच्या आंदोलनस्‍थळासह घरावर अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, चौकशीची मागणी

जरांगेंच्या आंदोलनस्‍थळी अज्ञात ड्रोनने टेहाळणी, चौकशीची मागणी
manoj jarange house drone antarwali sarati jalna maratha reservation protest
जरांगेंच्या आंदोलनस्‍थळी अज्ञात ड्रोनने टेहाळणी, चौकशीची मागणी जरांगे पाटील ( संग्रहित छायाचित्र )
Published on
Updated on

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा :

अंतरवाली सराटी गावात कोणी कितीही ड्रोन फिरवू द्या, मी समाजाकरिता आरक्षण लढा लढत राहिल. ड्रोन फिरत असले तरी मी घाबरणार नाही. माझे राहण्याचे ठिकाण बदलणार नाही. कुणी कितीही बदनामी करून दहशत तयार करण्याचा प्रयत्न केला तरी मी भीत नाही. आरक्षण लढा सुरूच राहील. माझी समाजाशी एकनिष्ठता होती आणि ती समाजाशी कायम राहील. मी मॅनेज होवू शकत नसल्याने हे असले प्रयोग सुरू असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. ते अंतरवाली सराटीत पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

manoj jarange house drone antarwali sarati jalna maratha reservation protest
Parliament Monsoon Session Live|काँग्रेस देशात अराजकता माजवत आहे; PM मोदींची बोचरी टीका

अज्ञात ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून घिरट्या

अंतरवाली सराटी गाव हे गेल्या अकरा महिन्यांपासून मराठा आंदोलनाचे केंद्र बनले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पण सध्या अंतरवाली सराटी गावात वास्तव्यास आहेत. दिनांक 26 जुन व 2 जुलै रोजी रात्री जरांगे पाटील जिथे हल्ली वास्तव्यास असतात त्या सरपंच कौशल्याबाई तारख यांच्या घरासह आंदोलनाच्या ठिकाणची अज्ञात तीन ते चार ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून घिरट्या घालून दोनदा रेकी करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलिसांना माहिती देवून ही ड्रोनच्या घिरट्या कोण आणि का घालत आहेत याचा उद्देश काय समजलं नाही.

manoj jarange house drone antarwali sarati jalna maratha reservation protest
Rahul Gandhi Letter to PM | NEET परिक्षाप्रश्नी संसदेत चर्चा व्हावी; राहुल गांधी यांचे PM मोदींना पत्र

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटी म्हणाले, ड्रोनच्या माध्यमातून रेकी करुन कोणाला काय साध्य करायचे आहे हे माहित नाही. मी घाबरुन माझा आरक्षण लढा व जनजागृती रॅली दौरा थांबवणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

manoj jarange house drone antarwali sarati jalna maratha reservation protest
पीएम मोदींच्या भाषणादरम्यान लोकसभेत विरोधकांचा गोंधळ

आज जरी कोणी ड्रोनच्या माध्यमातून आमच्यावर नजर ठेवत असले आणि असे प्रयोग किती जरी झाले तरी ते उघडं होईलच. मी कोणाला भीत नाही, माझा रस्ता सरळ असुन मराठा समाजाला टक्कर देण्याचं काम कोणी करू नये. मला गोळ्या घातल्या तरी मी मराठा समजासाठी मारायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

manoj jarange house drone antarwali sarati jalna maratha reservation protest
राहुल गांधी काय चुकीचे बोलले? उद्धव ठाकरेंचा सवाल

आपण पोलिसांत तक्रार केली नाही. करणार पण नाही कारण आम्हाला न्याय मिळणार नाही. मग तक्रार करून उपयोग काय. मराठा समाजात असा मेसेज गेलाय, आता आपल्याला न्याय मिळणार नाही, आपल्याला लढून मिळवावे लागणार आहे. मराठा समाजाचे गोरगरीब पोरं मोठे व्हावे यासाठी मी लढतोय आणि हा लढा थांबणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

मराठा आमदारांनी विधानसभेत आवाज उठवावा

मराठा समाजातील आमदारांनी विधानसभेत आवाज उठवावा, लोक प्रतिनिधींनी जनजागृती रॅलित सहभागी व्हावे मराठ्यांना चारी बाजूने घेरल्याने  मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सर्व मराठा आमदारांनी पक्ष, गटतट सोडून आता एकत्र यावे. अधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलुन मराठा समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावे. जे आमदार अधिवेशनात मराठा आरक्षणाची मागणी करतील, शांतता रॅलीत ताकदीने सहभागी होतात का. एकटेच सहभागी होतात सगळे एकत्र नाही आले तर सामान्य मराठा समाजाने एकत्र त्यांना आपली शक्ती दाखवून देतील. ओबीसी समाज ताकदीने एकत्र येऊ शकतो तर आता मराठ्यांनी या शांतता रॅलीत एकत्र यावे असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

अंतरवालीतील ड्रोन रेकी प्रकरणाचे पडसाद अधिवेशनात

मनोज जरांगे पाटील आंदोलन करत असलेल्या अंतरवाली सराटीत राहत असलेल्या ठिकाणी व आंदोलन ठिकाणी ड्रोन कॅमेराद्वारे टेहळणी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेचे पडसाद आज विधिमंडळातही उमटले. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी गृह विभागाने या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना समोर आणावे अशी मागणी केली. यावेळी उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई यांनी सांगितले की, स्थानिक पोलिसांकडून माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल.

अंतरवाली सराटी येथील ड्रोन घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना ग्रामस्थांनी रात्रीच दिली. पोलिसांनी रात्री येऊन पाहणी केली. मात्र अंधारामुळे हाती काही सुगावा लागला नाही. दुसऱ्या दिवशी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जरांगे पाटील यांची भेट घेऊन ड्रोन कॅमेऱ्या बाबत माहिती घेतली. किती ड्रोन होते कोणत्या दिशेने ड्रोन आले ही माहिती घेतली. मात्र हे पथक आल्या पावली परत गेले. या पथकालाही कोणतीही ठोस माहिती किंवा तपास करता आला नाही.

मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या

२६ जूनपासून ड्रोनने टेहाळणी सुरू आहे. याबाबत ग्रामस्थांनी गोंदी पोलिसांना माहिती दिली. यासंदर्भात त्यांनीही पाहणी केली. सोमवारी ही पुन्हा ड्रोनने अंतरवाली गावात व माझ्या मळ्यात टेहाळणी केली. याबाबत गोंदी पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार देणार आहे. झालेला प्रकार पाहता मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्यास यावी, अशी मागणी जरांगे यांचे सहकारी पांडुरंग तारख यांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news