मनोज जरांगे - अब्दुल सत्तार यांची बंद दाराआड ३ तास चर्चा

Manoj Jarange News | राज्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा
Manoj Jarange  Abdul Sattar meeting
अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. Pudhari News Network
Published on
Updated on

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange News) यांची आज (दि.५) अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत गाड्यांचा मोठा ताफा होता. यावेळी दोघांमध्ये बंद दरवाजा आड सुमारे ३ तास चर्चा झाली. मंत्री सत्तार यांच्या सोबतच फुलंब्री मतदार संघातून इच्छुक असलेले किशोर बलांडे यांनीही जरांगेंची भेट घेतली.

या दोघांमध्ये राज्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. तसेच मराठा आरक्षण आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानभरपाईबाबत चर्चा झाल्याचे सत्तार यांनी सांगितले. याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना कळवतो, असे जरांगे यांना सांगितल्याचे सत्तार यांनी सांगितले. आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि जरांगे यांच्यात जे बोलणे झाले आहे, त्यानुसार मुख्यमंत्री कार्यवाही करतील, असेही सत्तार यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, मात्र शेतकऱ्यांचे नुकसान लाखोंचे झाले आहे आणि भरपाई हजारांची दिली, असे होता कामा नये, असे जरांगे म्हणाले. (Manoj Jarange News)

Manoj Jarange  Abdul Sattar meeting
नुकसान भरपाई सरकारच्या छाताडावर बसून घेऊ : मनोज जरांगे- पाटील

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news