Crime News : दारूसाठी पैसे न दिल्याने सख्ख्या भावावर हल्ला

जालना शहरातील धक्कादायक प्रकार
Jalna crime news
Crime News : दारूसाठी पैसे न दिल्याने सख्ख्या भावावर हल्लाfile photo
Published on
Updated on

Man attacks own brother for refusing money for alcohol

जालना, पुढारी वृत्तसेवा : दारू पिण्यासाठी दोनशे रुपये देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून सख्ख्या मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात लाकडी दांड्याने प्रहार करून त्याला गंभीर जखमी केले आहे. संग्राम नगर भागात घडलेल्या या घटनेप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalna crime news
Crime News : तू माझी नाही झालीस, तर कोणाचीच होऊ देणार नाही

फिर्यादी बजरंग माधुसिंग राजपूत (२६, रा. संग्राम नगर, जालना) हे मजुरी आणि कडबा विक्रीचा व्यवसाय करतात. रविवार, दि.१४ रोजी सायंकाळी ६:१५ वाजता बजरंग हे आपल्या घरी असताना त्यांचा मोठा भाऊ बालाजी माधुसिंग राजपूत (रा. लोधीमोहल्ला, हा त्यांच्या घराजवळ आला.

बालाजी याने बजरंग यांना घराबाहेर बोलावून दारू पिण्यासाठी २०० रुपयांची मागणी केली. मात्र, "तू अगोदरच दारू पिलेला आहेस, पुन्हा दारू पिऊ नको. तुला दारूसाठी पैसे देणार नाही," असे बजरंग यांनी नकार दिला. नकार मिळाल्याने राग अनावर झाल्याने बजरंग यांना मारहाण केली.

Jalna crime news
illegal liquor transport : पोलिसांच्या कारवाईत 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

गुन्हा दाखल

पैसे देण्यास नकार देताच बालाजीचा पारा चढला. त्याने संतापाच्या भरात बाजूला पडलेला लाकडी दांडा हातात घेतला आणि बजरंग यांच्या डोक्यात जोराने मारून त्यांना रक्तबंबाळ केले. याप्रकरणी जखमी बजरंग राजपूत यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी बालाजी माधुसिंग राजपूत याच्याविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार विनोद निकम पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news