Farmer Crisis | दुष्काळाचा फळबागांना मोठा फटका! पाण्याअभावी आंबा, मोसंबी, डाळिंबाच्या बागा करपल्या

Farmer Crisis | निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका यंदा मराठवाड्यासह विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील फळबागांना बसला आहे.
Jalna Farmers Financial Crisis,
Jalna Farmers Financial Crisis,pudhari photo
Published on: 
Updated on: 

जालना : पुढारी वृत्तसेवा

निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका यंदा मराठवाड्यासह विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील फळबागांना बसला आहे. ठिबकची व्यवस्था असूनही पाणी नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी फळझाडे तोडली आहेत. वर्षानुवर्षे कष्टाने जोपासलेल्या आंबा, मोसंबी, डाळिंब आणि सीताफळाच्या बागा पाण्याअभावी करपू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Jalna Farmers Financial Crisis,
Jalna Water Supply : २ व ३ डिसेंबर रोजी जालना शहरात निर्जळी

पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला. मात्र, फळबाग उभी करण्यासाठी लागवडीपासून उत्पादनापर्यंत अनेक वर्षे मोठी मेहनत आणि आर्थिक गुंतवणूक करावी लागते. खते, औषधे, छाटणी, मजुरी, ठिबक सिंचन आणि पाणी व्यवस्थापनावर शेतकरी मोठा खर्च करतात.

अशा परिस्थितीत बागा उत्पादनक्षम होत असतानाच पाण्याचे संकट निर्माण झाल्याने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची भीती व्यक्त होत आहे. दुष्काळामुळे विहिरी, बोअरवेल व शेततळ्यांमधील पाणीसाठा घटत असल्याने फळझाडांना पुरेसे पाणी देणे कठीण झाले आहे. परिणामी, झाडांची पाने पिवळी पडत असून फळांची वाढ खुंटत आहे.

दुष्काळी परिस्थितीचा फटका फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. अनेक वर्षे मेहनत आणि लाखो रुपयांची गुंतवणूक करून उभ्या केलेल्या फळबागा पाण्याअभावी करपू लागल्या आहेत. प्रशासनाने तातडीने फळबागांचे सर्वेक्षण करून नुकसानीचे पंचनामे करावेत.

- अशोक हेमके, मराठवाडा युवा अध्यक्ष, क्रांतिकारी शेतकरी संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.