Jalna Water Supply : २ व ३ डिसेंबर रोजी जालना शहरात निर्जळी

जायकवाडीचा-जालना पाणीपुरवठा तांत्रिक कारणांमुळे राहणार बंद
Jalna Water Supply
Jalna Water Supplypudhari photo
Published on: 
Updated on: 

जालना : जायकवाडी-जालना योजनेतुन जालना शहरास होणारा पाणी पुरवठा २ व ३ डिसेंबर रोजी काही तांत्रिक कारणामुळे बंद करण्यात येणार असल्याने शहरास आठ दिवसाआड होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होउन नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेंंतर्गत पैठण व अंबड येथील पंपीग स्टेशनमध्येा मुख्यय पाईपलाईन जोडण्याडसाठी व आवश्यजक ती तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार आहे. जायकवाडी-जालना मुख्यह पाईपलाईनवर एयरवॉल्वकची दुरुस्तीो व बदली करणे या सारखी कामे सुरक्षितरित्या व तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित पंपिंग स्टेशनचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे.

Jalna Water Supply
CM Pramod Sawant | गोव्यातील सर्व कार्यालयांसाठी मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश; POSH कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य

उपरोक्त सर्व कामे एकाच कालावधीत पूर्ण करून पाणीपुरवठा यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने 02 डिसेंबर ते 03 डिसेंबर 2026 या तीन दिवसांच्या कालावधीत सलग शटडाऊन घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सदरील कामे लवकरात लकवर पुर्ण करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्यानत येणार आहे. महापालिकेकडुन करण्यात येणाऱ्या या कामांमुळे जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जालना शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.

शहरात सध्या आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. दोन दिवस पाणी पुरवठा होणार नसल्याने पाणी पुरवठ्याची सायकल तुटणार असल्याने शहरवासियांना आता दहा ते बारा दिवस पाण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.शहरात नोव्हेंबर महिन्यातच पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले असल्याने आगामी जानेवारी महीन्यानंतर जालन्याचा पाणी प्रश्न गंभीर बनण्याची भिती आहे.

Jalna Water Supply
Prakash Abitkar : रुग्णसेवेतील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही !

शहरातील विविध प्रभागात पाणी पुरवठा योजनेच्या व्हॉाल्व मधुन सुरु असलेली पाणी गळती थांबविणे गरजेचे आहे. नसता उन्हाळ्यात पाणी गळती सोबतच पाईप फुटण्याचे व व्हॉल्व्हमधून गळती वाढण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांच्या घरात येणारे पाणी रस्त्यावर वाहताना दिसून येणार आहे.

अपव्यय टाळा

जालना शहरातील नागरिकांनी जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेचा शटडाऊनचा कालावधी लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, पाण्याचा वापर काटकसरीने करावा तसेच पाण्याचा अपव्यय टाळून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.