Jalna Crime News : पैसे दुप्पट करण्याचे आमिष; ४ लाखांचा गंडा !

चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपींचा शोध सुरू
scam |
Jalna Crime News : पैसे दुप्पट करण्याचे आमिष; ४ लाखांचा गंडा !File Photo
Published on
Updated on

Lure of doubling money; 4 lakhs scam!

जालना, पुढारी वृत्तसेवा : पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून तुळजापूर येथील एका महिला संचालिकेची तब्बल चार लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात बुधवार, दि. २२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींनी पैशांच्या बंडलमध्ये पाण्याच्या बाटल्या भरून गंडा घातल्याचे समोर आले आहे.

scam |
Crime News : कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक, २७ गोवंश जनावरांची सुटका

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी बालिका राजसिंग सूर्यवंशी (४२, रा. नरिमन प्लॅट, तुळजापूर, जि. धाराशिव) या तुळजापूर येथे वास्तु-वास्तुशास्त्र सूचक केंद्र चालवतात. त्यांची आरोपी देवानंद किसन गवळी (रा. आशागाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा) याच्याशी १५ वर्षांपासून ओळख होती. दरम्यान, फिर्यादी या त्यांच्या सहकाऱ्यांसोबत ०२ जानेवारी २०२६ रोजी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव येथे जात असताना, पाळधी येथे देवानंद गवळी हा त्यांना भेटला.

त्यावेळी आरोपीने "तुम्हाला पैसे दुप्पट करून देतो," असे सांगत एका इसमाचा मोबाईल नंबर देऊन रोहिते गावाजवळ बोलावले. तेथे आरोपीने तीन पैशांच्या बोग्या दाखवून खात्री करण्यासाठी पाचशे रुपयांच्या तीन खऱ्या नोटा दिल्या. त्यानंतर विश्वास बसल्याने फिर्यादीने वाडेगाव (जि. बुलढाणा) येथील एका सहकारी पतसंस्थेत आपले साडेपाच तोळे सोन्याचे दागिने गहाण ठेवून ३ लाख रुपये रोख घेतले. या २ लाख आणि इतर रक्कम मिळून एकूण ४ लाख रुपये रोख ३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी कन्हैय्या नगर नगर चौफुली, जालना येथे आल्यावर आरोपीच्या ओळखीच्या व्यक्तिला पिशवीत दिले.

scam |
Paithan News : विविध संतांच्या पालखी सोहळ्याच्या मुक्कामामुळे करकंब नगरी हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेली

आरोपी तेथून निघून गेल्यानंतर सोबत असलेल्यांनी पिशवी उघडून पाहिली असता, त्यात पैसे नसून पाण्याच्या बाटल्या आढळल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने चंदनजिरा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस हवालदार संदीप उगले करत आहेत.

नोटांचे बंडलऐवजी पाण्याच्या बॉटल

आरोपीने तीन पैशांच्या बॅगा दाखवून खात्री करण्यासाठी पाचशे रुपयांच्या तीन खऱ्या नोटा दिल्या. त्यानंतर विश्वास बसल्याने फिर्यादीने वाडेगाव (जि. बुलढाणा) येथील एका सहकारी पतसंस्थेत आपले साडेपाच तोळे सोन्याचे दागिने गहान ठेवून ३ लाख रुपये रोख घेतले. या २ लाख आणि इतर रक्कम मिळून एकूण ४ लाख रुपये रोख ३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी कन्हैय्या नगर नगर चौफुली, जालना येथे आल्यावर आरोपीच्या ओळखीच्या व्यक्तिला पिशवीत दिले. बॅग तपासली असता त्यात नोटांचे बंडलऐवजी पाण्याच्या बॉटल दिसून आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news