Paithan News : विविध संतांच्या पालखी सोहळ्याच्या मुक्कामामुळे करकंब नगरी हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेली

श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळा पंढरपूर तालुक्यात दाखल
Paithan News
Paithan News : विविध संतांच्या पालखी सोहळ्याच्या मुक्कामामुळे करकंब नगरी हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेलीfile photo
Published on
Updated on

The Shri Sant Eknath Maharaj Palkhi procession has entered Pandharpur Taluka

पैठण, पुढारी वृत्तसेवा : भानुदास एकनाथ हरिनामाचा गजर करीत ४२७ वर्षांची परंपरा, मानाचे स्थान असलेल्या श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याने संत श्री सावता महाराज यांच्या अरण (ता. माढा) या पावन भूमीत बुधवारी (दि.२२) मुक्काम पूर्ण केला. सोळाव्या मुक्कामासाठी सायंकाळी करकंब (ता. पंढरपूर) येथे दाखल झाला. श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज, निळोबाराया महाराज या संतांच्या पालखी सोहळ्यासह मराठवाड्यातून मार्गस्थ झालेल्या विविध संतांच्या पालख्या या करकंब नगरीत मुक्कामासाठी असतात.

Paithan News
BMD Test : तुमची हाडे ठिसूळ तर नाही ना ? घाटीत करा तपासणी

करकंब येथील जिल्हा परिषद सदस्य आदिनाथ देशमुख, सरपंच शरदचंद्र पांढरे, विवेक शिगटे, सपोनि योगेश लंगोटे यांच्यासह करकंब नगरीतील विविध पक्षांचे पदाधिकारी, शासकीय कर्मचारी व भाविकांनी नाथांच्या पादुकांचे पूजन करून सोहळा प्रमुखांसह पंढरीला निघालेल्या वारकऱ्यांचे स्वागत केले. दिंड्यातील वारकरी, भाविकांमुळे येथे अवधी पंढरी अवतरल्याचा भास होत होता.

शिवाय रात्री उशिरापर्यंत चाललेल्या हरिनामाच्या गजराने अवधी करकंब नगरी दुमदुमून गेली. दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथील संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याने करकंब हद्दीत प्रवेश केला. हजारो भाविकांचा जनसागर मुकुंद व्यवहारे यांच्या शेतात दाखल झाला.

Paithan News
Crime News : कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक, २७ गोवंश जनावरांची सुटका

मध्यभागी पालखी ठेवून त्याभोवती प्रथम 'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या जयघोषात पताकाधारी भाविकांनी दोन रिंगण पूर्ण केले. त्यानंतर भरधाव अश्वाने तीन फेऱ्या मारल्या. यावेळी अश्वाच्या टापाखालील पवित्र माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. टाळकऱ्यांचा उडी खेळ रंगला. पखवाजवाल्या भाविकांचे आणि तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला भाविकांचे रिंगण पार पडले. शेवटी पुन्हा एकदा अश्वाचे देव रिंगण पार पडले.

स्थानिक प्रशासनाच्या वतीने स्वागत

जळोली चौकात पालखीचे स्वागत स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. दर्शनासाठी पालखी सोहळ्याचा विसावा करकंब येथील विठ्ठल मंदिरात करण्यात आला. यावेळी नाथांच्या पादुकांची समाज आरती मोठ्या उत्साहात झाली. आज गुरुवारी सोहळ्याचा शेवटचा मुक्काम भीमातीरी होळे (ता. पंढरपूर) येथे होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news