

Lively scene of the marriage ceremony of Shri Krishna-Rukmini
जालना, पुढारी वृत्तसेवा : आपल्या जीवनात येणारी सुख दुःख हे दुसरे देत नाही तर स्वतःच्या कर्माची फळं आहेत. आज इंद्रियांना आपण विनाशाकडे घेऊन चाललो आहोत. मंदिरात पूजा करताना सगळे भक्त असतात, मंदिरातील पूजेनंतरही देव तुमच्यावर लक्ष ठेवतो. आरतीसुद्धा स्वार्थी झाली.
मंदिरातून घरी आल्यावर तुम्ही माता - पित्यांना साधे पाणीसुद्धा देत नसाल तर पूजा व्यर्थ आहे. जन्मदात्यांना मनातून वंदन करा, साक्षात विठ्ठल तुमच्या भेटीला येतील, असे महत्त्व आचार्य परमपूज्य गौरव कृष्ण गोस्वामीजींनी विषद केले. शाम संग राधा नाचे रे..., शाम तेरी दिवानी हू मै...! श्री राधावर कुंज बिहारी, मुरली गोवर्धन धारी, अशा भक्ती गीतांवर भाविकांनी नृत्य करत श्रीकृष्ण - रुक्मिणी विवाह साक्षात याची देही अनुभवला.
हरे कृष्णा सत्संग समितीच्या वतीने वेदमाता गायत्री मंदिर परिसरातील वृंदावन धाम येथे आयोजित श्रीमद् भागवत कथेत परमपूज्य गौरव कृष्ण गोस्वामीजी यांनी अमृतमय वाणीतून महारास कथा, मथुरागमन, श्री रुक्मिणी विवाह महोत्सवावर विवेचन केले.
' प्रारंभी मुख्य यजमान गोपाल गोयल, समितीचे अध्यक्ष घनश्यामदास गोयल, कांताबाई जैस्वाल, प्रसाद यजमान सुरेंद्र चेचाणी, रामनिवास गौड, हरे कृष्णा सत्संग समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी, धीरेंद्र मेहरा, मनोज दायमा, मनीष तवरावाला, अमोल बांगड, गौरव बोरा, रामेश्वर अग्रवाल, प्रवीण सोमाणी, चंद्रकांत अंभोरे, शुभम जैस्वाल, कुलदीप सिंह राजपुरोहित, सुरेंद्र शेडुते, महेश सारस्वत, विष्णू खंडेलवाल, धनराज मिश्रा, अमोल महाजन, आनंद मंत्री, सुरेंद्र शेडुते यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी भाविक भक्तांची उपस्थिती होती.
वृंदावनाचे महत्त्व
आचार्य गौरव कृष्ण गोस्वामीजींनी 'देवाचं दर्शन हे आत्म्याला संतुष्ट करते, प्रभूचे चरण पकडले नाही तर सुखातही दुःखी राहाल आणि भगवंताला शरण गेले तर दुःख सुद्धा हसत -हसत झेलाल. दुःखाचे पर्वत गोविंद उचलतील, तुम्ही हिंमत ठेवा' असे सांगून इंद्र तसेच महारास मधून कामदेवाचा अभिमान श्रीकृष्णाने तोडत योगमाया, कंसाचा वध, देवकी वसुदैवाची मुक्तता, वेदाध्ययन, गोपिकांचा विरह, प्रेमाची भूमी असलेल्या वृंदावनाचे महत्त्व यावर सविस्तर विवेचन केले.