

Leopard spotted in Pimpalgaon Renukai area; panic among villagers
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवाः भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास भोकरदन येथून वरुडकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारासह शेतकऱ्यांना अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने बिबट्याची दहशत वाढली आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
पिंपळगाव रेणुकाई परिसरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. में महिन्यापासून विवट्याचा परिसरात वावर आहे. बिबट्याने आजपर्यंत मानवावर हल्ला केला नसला तरी कुत्रे, हरिण, वासरु यासारख्या जनावरांची शिकार केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
पिंपळगाव रेणुकाई, करजगाव, कोठा-कोळी, माहळाई, वरूड रेलगाव आदी गावांच्या परिसरात बिबट्या फिरत असल्याने शेती कामे करण्यासाठी शेतमजूर शेतात येत नसल्याचे चित्र आहे. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भोकरदन पिंपळगाव रेणुकाई वरुड पाटीवर राजेंद्र वाघ हे दुचाकीवरुन जात असताना त्यांच्या दुचाकी समोरून बिबट्याने रस्ता ओलांडत दर्शन दिले. यावेळी बिबट्या पाहिला. बिबट्या वरुड फाट्यावरुन रेलगावकडे गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.