Learning license : बनावट वेबसाईटद्वारे लर्निंग लायसन्स

बिहार राज्यातून सायबर पोलिसांनी एकास केले जेरबंद; लॅपटॉप, आयफोन, थंब मशीन जप्त
Learning license
Learning license : बनावट वेबसाईटद्वारे लर्निंग लायसन्सFile Photo
Published on
Updated on

Learning license through a fake website

जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या संगणक प्रणालीत अनाधिकृत प्रवेश करीत बनावट वेब साईट तयार करुन बनावट लायसन्स देणाऱ्या आरोपीस बिहार राज्यातुन सायबर पोलिसांनी जेरबंद केले.

Learning license
Crime News : जालना जिल्ह्यात सरत्या वर्षात ४४ खून

जालना येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अभिजित कडुबा बावस्कर यांनी २६ नोव्हेंबर रोजी फिर्याद दिली होती की, अज्ञात आरोपीतांनी एक बनावट वेबसाईट बनवुन सरकारी संगणक प्रणालीमध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करुन सरकारी प्रक्रियेचा दुरुपयोग करुन नागरीकांकडुन आर्थिक फायदयाच्या दृष्टीने बनावट लर्निंग ड्रायव्हींग लायसन्स मिळवुन दिले.

यावरुन सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीतांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाच्या आरोपी निष्पन्न झाल्यानंतर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन आरोपीतांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, अप्पर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, सायबर शाखेचे पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे यांनी पथक तयार करुन गुन्हातील आरोपीचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या.

Learning license
Bhokardan News : पशुवैद्यकीय दवाखाना कर्मचाऱ्यांअभावी आजारी

त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक २३ डिसेंबर रोजी रवाना झाले होते. गुन्हयातील आरोपी बिट्टराज प्रमोद यादव (रा. टेंगराहा, जि. सहरसा राज्य-विहार) हा त्याचे ठिकाण वारंवार बदलत असल्याने त्याचा शोध घेण्यात अडचणी निर्माण होत होत्या. त्यानुषंगाने पथकाने आर ोपीताचा पटना शहर, सिमरी बख्तियारपुर व टेहेंगर (जि. सहरसा राज्य बिहार) येथे स्थानिक पातळीवर जावुन पोलीस अधीक्षक सहरसा हिमांशु व सायबर पोलीस ठाणे पोलीस उप अधीक्षक अजित कुमार यांच्या पथकासह आरोपीताचा शोध घेवुन त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातुन गुन्हा करण्यासाठी वापरलेला लॅपटाप, आयफोन, थम्ब मशिन असा १ लाख ४६ हजाराचा मुददेमाल जप्त करण्यात आला.

सदर गुन्हयामध्ये यापूर्वी जम्मू कश्मीर येथुन आरोपी नामे फैसल वशीर मीर (रा. ब्रामरी ड्रगमुल्ला, कुपवाडा, राज्य जम्मु कश्मीर) व जालना येथील आरोपी नामे मुजाहिद ऊर्फ डॉन रईसोद्दीन अन्सारी, (रा. नादी कॉलनी, जालना) यांना सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, सहरसा जिल्हयाचे पोलीस अधीक्षक हिमांशु, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उप अधीक्षक अजित कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे, पोउपनि. राजेंद्र वाघ, पोउपनि, योगेश चव्हाण, व सोबत स्थागुशाचे अमंलदार प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, इरशाद पटेल, दत्ता वाधुंडे व सायबर पोलीस ठाण्याचे अंमलदार संदीप मांटे, सचिन चौधरी, गणेश राठोड तसेच सायबर पोलीस ठाणे, सहरसा राज्य बिहार येथील पोउपनि. आकाश आनंद, पोलीस अंमलदार फिलिप्सकुमार सिंह, विष्णुकुमार रॉय यांनी केली.

चार दिवसांची कोठडी

जालना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या संगणक प्रणालीत अनाधिकृत प्रवेश करीत बनावट वेब साईट तयार करुन बनावट लायसन्स देणाऱ्या गुन्हयातील अटक आरोपी बिट्टराज प्रमोद यादव यास न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवसाची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news