Bhokardan News : पशुवैद्यकीय दवाखाना कर्मचाऱ्यांअभावी आजारी

भोकरदन तालुक्यातील चित्र, जनावरांना उपचार मिळेना
Bhokardan News
Bhokardan News : पशुवैद्यकीय दवाखाना कर्मचाऱ्यांअभावी आजारीFile Photo
Published on
Updated on

Bhokardan News: Veterinary clinic sick due to lack of staff

आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन अनेक तालुक्यातसह आन्वा येथील वर्ग एक पशुवैद्यकीय दवाखाना वर्षांपासून कर्मचान्यांच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे आन्वासह परिसरातील जनावरांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर उमटत असून, उपचार करताना एकाच कर्मचाऱ्यावर ताण पडत आहे.

Bhokardan News
महापालिका निवडणुकीचे गणित बिघडले; माविआ-महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम

आन्वा येथे आठ गावांसाठी ४५ वर्षांपासून वर्ग एक पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात आला आहे. या पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत आन्वा, वाकडी, कुकडी, आन्वा पाडा, जानेफळ गायकवाड, कारलावाडी, कोदा, धोंडखेडा या गावातील पशुपालक जनावरांचे उपचारासाठी येत असून गाई, म्हशी, बैल, शेळी, मेंढी, कोंबड्या आजारी पडल्यास परिसरात हा एकमेव सरकारी दवाखाना उपलब्ध आहे. मात्र, हा दवाखानाच कर्मचाऱ्यांअभावी आजारी पडला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पशुपालकांच्या जनावरांवर उपचार करताना एका कर्मचाऱ्याची मोठी धावपळ होत असल्याचे दिसून येत आहे.

या ठिकाणी चार पदे असून, त्यापैकी फक्त एकच कर्मचारी कार्यरत आहे. लसीकरण असो की जनावरांची जखम साफ करणे आदी कामे एकाच कर्मचाऱ्याला करावी लागत आहेत. एवढेच नव्हे तर साफसफाईचे कामहीया दवाखान्यात गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांची उणीव भासत आहे. तरीही वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

Bhokardan News
Crime News : जालना जिल्ह्यात सरत्या वर्षात ४४ खून

त्यामुळे जनावरांचे मोठे हाल होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तालुक्यातील आन्वा, पारध, जवखेडा, नळणी, हसनाबाद, वरुड, जळगाव सपकाळ, चांधई टेप्ली, तळेगाव या श्रेणी १ च्या पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. तालुक्यात १६ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यात ७ दवाखाने केंद्र शासनाचे आहे तर ९ दवाखाने जिल्हा परिषदेचे आहेत. मात्र, त्यापैकी ७पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत तर तालुका पशुधन विकास अधिकाऱ्याचे पद सुद्धा रिक्त आहेत. त्यामुळे या पदाचा अतिरिक्त पदभार पशुधन विकास विस्तार अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला.

दवाखान्यात १६ पैकी फक्त ९ डॉक्टर

तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाला मागील काही वर्षांपासून रिक्तपदाचे ग्रहण लागले असून, या विभागात महत्त्वाची पदे रिक्त असल्याने पशुवैद्यकीय सेवा वाऱ्यावर आहे. त्यामुळे पशुपालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १६ पैकी ९ पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरच नसल्याने जनावरांना वेळेवर उपचार मिळत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news