Jalna liquor raid : 105 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त

रामनगर भागात एलसीबीची कारवाई
Jalna liquor raid
Jalna liquor raidpudhari photo
Published on
Updated on

जालना : शहरातील रामनगर ख्रिस्ती कॅम्प भागात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी 10,500 रुपये किमतीची एकूण 105 लिटर गावठी दारू जप्त केली असून एका आरोपीला रंगेहाथ अटक केली आहे.

सोमवार, दि.1 रोजी स्थानिक गुन्हे शाखा (स्थागुशा), जालना येथील पोलिस पथक सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सपोउपनि पळसरे, पोहेकॉ राठोड, पोहेकॉ पटेल, आणि पोहेकॉ. चिंचोले पेट्रोलिंग करीत होते. त्यांना रामनगर ख्रिस्ती कॅम्प भागात एक व्यक्ती विनापरवाना व बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

Jalna liquor raid
Illegal Liquor Raid Uran: चाणजेच्या जंगलात गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त; पिंपरी, चिंचवडातील दारुकांडानंतर गुन्हे शाखेचा छापा

खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर, पोलिस पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन संध्याकाळी 7:30 वाजताच्या सुमारास रामनगर ख्रिस्ती कॅम्प येथील चंदू राजपूत याच्या किराणा दुकानाजवळ सार्वजनिक ठिकाणी छापा टाकला. त्या ठिकाणी पोलिसांना एक संशयास्पद इसम मिळून आला. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव चंदूधसिंग कुंजीलाल राजपूत (57 वर्षे, व्यवसाय- मजुरी, रा. रामनगर ख्रिस्ती कॅम्प, जालना) असे सांगितले.

पोलिस पथकाने पंचांसमक्ष घटनास्थळाची झडती घेतली असता, एका ताडपत्रीमध्ये गोणपाटाच्या पोत्याखाली लपवून ठेवलेले काळ्या रंगाचे तीन प्लास्टिकचे कॅन मिळून आले. प्रत्येकी 35 लिटर क्षमतेच्या या तीन कॅनमध्ये एकूण 105 लिटर गावठी हातभट्टीची दारू भरलेली होती. या दारूची बाजारपेठीय किंमत अंदाजे 10,500 रुपये (प्रति लिटर 100 रुपये) आहे.

Jalna liquor raid
Pune Illegal Liquor Crackdown: पुणे–पिंपरी चिंचवडमध्ये हातभट्टी दारूवर धडक कारवाई, शहरात पोलिस ॲलर्ट

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल प्रभाकर वाघ यांच्या फिर्यादीवरून आरोपी चंदूधसिंग कुंजीलाल राजपूत याच्याविरुद्ध सदरबाजार पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news