Koyata gang : भरदिवसा ट्रॅव्हल्स फोडून चोरी करणारी कोयता गँग जेरबंद

मंठा पोलिसांकडून अवघ्या दोन तासांत आरोपीला अटक
Chatrapati Sambhajinagar Crime |
Koyata gang : भरदिवसा ट्रॅव्हल्स फोडून चोरी करणारी कोयता गँग जेरबंदFile Photo
Published on
Updated on

Koyata gang that broke into travel agencies and stole in broad daylight arrested

मंठा, पुढारी वृत्तसेवा मंठा शहरालगत असलेल्या मंठा-जालना रोडवर ३१ मार्च रोजी भरदिवसा ट्रॅव्हल्सच्या काचा कोयत्याने फोडून अज्ञात चोरट्यांनी ट्रॅव्हल्समधून २५ हजार रुपये किमतीच्या दोन बॅटऱ्या चोरून नेल्या होत्या. मंठा पोलिसांनी या प्रकरणातील तीन आरोपींना गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन तासांत जेरबंद करण्यात यश मिळवले.

Chatrapati Sambhajinagar Crime |
MD drugs seizure : मसनतपूर भागात एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

मंठा तालुक्यातील केंधळी येथील प्रल्हाद श्रीमंतराव शिरसाट यांनी मंठा पोलिस ठाण्यात १ एप्रिल रोजी तक्रार दिली होती की, त्यांची मंठा-जालना रोडवरील विठ्ठल रखुमाई मंगल कार्यालयासमोर उभी असलेल्या ट्रॅव्हल्सच्या काचा कोयत्याने अन ोळखी व्यक्तीने फोडून ट्रॅव्हल्समधील २५ हजार रुपये किमतीच्या दोन बॅटऱ्या चोरुन नेल्या.

Chatrapati Sambhajinagar Crime |
Jalna Crime : मंठ्यात भरदिवसा ट्रॅव्हल्स गाडीवर अज्ञाताचा कोयता अन्‌‍ दगडाने हल्ला

आरोपी हे काळ्या रंगाच्या स्कार्पीओमधून त्यांनी चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले होते. मंठा पोलिसांनी फुटेजमध्ये दिसणारे चार इसम व ब्लॅक स्कार्पीओची माहिती घेतली. ते चार इसम हे जालना शहरातील गांधी चौक येथील असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जालना येथून संशयित ओमकार भगवान काळे (रा पाटोदा ता मंठा), अविनाश अंकुश वाघमारे (रा माळीप-येऊनरा गांधी चमन, जालना) व वैभव सत्यप्रकाश गव्हाणे (रा. जालना) यांना काळ्या स्कार्पीओसह ताब्यात घेतले. एक आरोपी फरार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news