Jalna Crime : जालन्यात छुप्या दारू भट्टीवर कदीम पोलिसांचा छापा

7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाविरुद्ध गुन्हा दाखल
Jalna Crime
जालन्यात छुप्या दारू भट्टीवर कदीम पोलिसांचा छापाfile photo
Published on
Updated on

जालना : जुना जालना भागातील साठे नगर येथे छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या एका गावठी हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर कदीम जालना पोलिसांनी छापा टाकून एका आरोपीला रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी 7 हजार रुपये किमतीची एकूण 70 लिटर हातभट्टीची दारू जप्त केली असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सोमवार, दि. 1 रोजी कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वाघ, पोलिस हवालदार राठोड आणि पोलिस कॉन्स्टेबल असे पथक पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते.

Jalna Crime
Illegal Liquor : अवैध दारूविक्रेते पोलिसांच्या रडारवर; तीन लाखांची दारू पकडली

या दरम्यान पोलिसांच्या गोपनीय बातमीदाराकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली की, जुना जालन्यातील साठे नगर भागात असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू तयार करत आहे. माहिती मिळताच पोलिस पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन रात्री 9 वाजेच्या सुमारास साठे नगर येथील संशयित पत्र्याच्या शेडवर अचानक छापा टाकला.

या छाप्यादरम्यान पोलिसांना तिथे एक इसम मिळून आला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपले नाव शेख अजहर शेख युसुफ (36 वर्षे, रा. वल्ली मामु दर्गा, नवा जालना) असे सांगितले.

Jalna Crime
Ahilyanagar Gambling Raid: रेल्वे स्टेशन रोडवर जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 18 जण ताब्यात

आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी प्रत्येकी 35 लिटर क्षमतेचे दोन पांढऱ्या रंगाचे कॅन जप्त केले, ज्यामध्ये एकूण 70 लिटर गावठी हातभट्टीची दारू भरलेली होती. या जप्त केलेल्या दारूची अंदाजे किंमत 7,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. उर्वरित नाशवंत मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई कदीम जालना पोलिसांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news