Jalna White Tur Price : पांढऱ्या तुरीला १०,६५० रुपये हंगामातील उच्चांकी कमाल दर

एपीएमसीत पिवळ्या सोयाबीनची ९,९४९ पैकी ७,९६७ क्विंटल आवक
Jalna White Tur Price
Jalna White Tur Price pudhari photo
Published on: 
Updated on: 

जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवार, ९ रोजी झालेल्या लिलावात पांढऱ्या तुरीला १० हजार ६५० रुपये इतका या हंगामातील उच्चांकी कमाल दर मिळाला.

बाजारात विविध शेतमालाची मोठी आवक पाहायला मिळाली असून बाजारात एकाच दिवसात ६ कोटी ५ लाख १७ हजार ४४८ रुपये किमतीची भरघोस उलाढाल झाली आहे. आजच्या लिलावात पिवळ्या सोयाबीनची तब्बल ७,९६७ क्विंटल एवढी विक्रमी आवक झाली असून त्याला सर्वसाधारण ६,५०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. तर दुसरीकडे, पांढऱ्या तुरीला १०,६५० रुपये असा या हंगामातील उच्चांकी कमाल दर मिळाला आहे.

Jalna White Tur Price
Jalna Water Wastage Fine : पाण्याचा अपव्यय केल्यास २५ हजारांचा दंड; फौजदारी गुन्हाही दाखल होणार !

बाजार समितीने प्रसिद्ध केलेल्या दैनंदिन आढाव्यानुसार, बाजारात एकूण ९,९४९ क्विंटल शेतमालाची आवक झाली. यामध्ये सर्वाधिक वाटा पिवळ्या सोयाबीनचा राहिला. कडधान्यांमध्ये पांढऱ्या तुरीला किमान ६,०११ रु., कमाल १०,६५० रु. आणि सर्वसाधारण ९,५०० रु. दर मिळाला.

काळ्या उडदाला ९,६०० रुपये कमाल भाव मिळाला, तर चमकी मुगाची ३७ क्विंटल आवक होऊन त्याला कमाल ९,४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. गावरान हरभऱ्याला ७,४०० रुपयांपर्यंतचा दर लाभला. धान्य वर्गात शाळू ज्वारीला बाजारात चांगली मागणी दिसून आली. ५९६ क्विंटल आवक झालेल्या शाळू ज्वारीला कमाल ६,८०० रुपये भाव मिळाला.

Jalna White Tur Price
Neelam Gorhe : सोमवारपर्यंत गावोगावी चारा उपलब्ध करा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news