Jalna Water Wastage Fine : पाण्याचा अपव्यय केल्यास २५ हजारांचा दंड; फौजदारी गुन्हाही दाखल होणार !

१५ ऑक्टोबरपर्यंत नळ, तोट्या आणि जलवाहिनीतील गळती दुरुस्त करण्याचे निर्देश
Jalna Water Wastage Fine
Jalna Water Wastage Fine pudhari photo
Published on: 
Updated on: 

जालना : शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जालना महानगरपालिकेने कडक भूमिका घेतली आहे. पाण्याचा अपव्यय, नळ अथवा जलवाहिनीतील गळती आणि अनधिकृत नळजोडणी आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पहिल्या वेळी ५ हजार रुपये, दुसऱ्या वेळी १० हजार रुपये, तर तिसऱ्या वेळी २५ हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाईही प्रस्तावित करण्यात आली आहे.

शहरातील सर्व नागरिकांनी घरगुती नळजोडणी, नळ, तोट्या आणि अंतर्गत जलवाहिनीतील गळती अथवा आवश्यक दुरुस्तीची कामे १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. शहराला पाणीपुरवठा झाल्यानंतर आवश्यक तेवढे पाणी भरून तातडीने नळ बंद करावेत. पाणी रस्त्यावर, नाल्यांमध्ये किंवा इतर ठिकाणी वाहून जाणार नाही,याची दक्षता घ्यावी. प्रत्येक नागरिकाने नळांना योग्य तोट्या बसवून पाण्याची गळती रोखावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Jalna Water Wastage Fine
Neelam Gorhe : सोमवारपर्यंत गावोगावी चारा उपलब्ध करा

पाणीपुरवठा व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडू नये, यासाठी महानगरपालिकेच्या जलवाहिनीवरून थेट पाणी खेचण्यासाठी विद्युत मोटार किंवा पंपाचा वापर करू नये. अनधिकृत नळजोडण्या अधिकृत करून घ्याव्यात. महानगरपालिकेच्या जलवाहिनीत परवानगीशिवाय छेडछाड करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पिण्याच्या पाण्याचा वापर रस्ते धुण्यासाठी, घरासमोरील परिसर धुण्यासाठी किंवा वाहने धुण्यासाठी करून पाण्याचा अपव्यय करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. यंदा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

पाणी वाया घातल्यास किती दंड ?

  • पहिल्यांदा उल्लंघनः ५,००० रुपये पाण्याचा अपव्यय किंवा नियमभंग आढळल्यास.

  • दुसऱ्यांदा उल्लंघनः १०,००० रुपये पुन्हा नियमभंग केल्यास.

  • तिसऱ्यांदा उल्लंघनः २५,००० रुपये दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही प्रस्तावित

Jalna Water Wastage Fine
Nanded Crime : कंधार तालुक्यात गांजाची शेती; सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा

शहरवासीयांनी काय खबरदारी घ्यावी ?

  • पाणी भरल्यानंतर नळ तत्काळ बंद करावा.

  • प्रत्येक नळाला योग्य तोटी बसवावी.

  • नळजोडणी व अंतर्गत जलवाहिनीतील गळती दुरुस्त करावी.

  • १५ ऑक्टोबरपर्यंत आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत.

  • जलवाहिनीवरून थेट पाणी खेचण्यासाठी विद्युत मोटार किंवा पंप वापरू नये.

  • अनधिकृत नळजोडणी अधिकृत करून घ्यावी.

  • परवानगीशिवाय जलवाहिनीत छेडछाड करू नये.

  • रस्ते, घरासमोरील परिसर किंवा वाहने धुण्यासाठी पिण्याचे पाणी वाया घालवू नये.

अनधिकृत नळजोडणी, पाण्याचा अपव्यय करणाऱ्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई शहरातील उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नळ, तोट्या आणि जलवाहिनीतील गळती तातडीने दुरुस्त करून पाण्याचा अपव्यय टाळावा. अनधिकृत नळजोडणी, जलवाहिनीतील छेडछाड आणि पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेस सहकार्य करावे.

अंजली शर्मा, आयुक्त, महानगरपालिका, जालना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news