Jalna News : वीर सावरकर जलतरण तलाव अडगळीत

मनपा प्रशासनासह लोकप्रतिनिधींची अनास्था
Jalna Veer Savarkar swimming pool condition
जालना ः मोती तलावाशेजारी अशा प्रकारे जलतरण तलाव उभारण्यात आला आहे.pudhari photo
Published on
Updated on

जालना ः जालना शहर महानगरपालिकेच्या मालकीचा आणि शहरात एकमेव सार्वजनिक असलेला स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव दुरुस्तीअभावी अडगळीत पडला आहे. या तलावाकडे मनपा प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, मोती बाग तलावाच्या निसर्गरम्य काठावर हा तलाव सुरू होता. परंतु काही दुर्घटना घडल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून तलावाला टाळे ठोकले होते. परंतु जालनेकरांचा रेटा, नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत वारंवार या संदर्भात झालेली चर्चा लक्षात घेता शासनाने जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून या तलावाच्या दुरुस्तीला निधी दिला.

Jalna Veer Savarkar swimming pool condition
Vasai Virar Municipal Budget: वसई-विरार महापालिकेच्या अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह; वीज बिल व वाहन खर्चावरून विरोधकांचा हल्लाबोल

तत्कालीन आयुक्त संतोष खांडेकर यांच्या पुढाकारातून या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाच्या दुरुस्तीचे कामही सुरू झाले होते. मात्र, आता मनपाचा कारभार लोकप्रतिनिधींच्या हाती आला आहे. यावर मनपाच्या सभागृहात कोणीही आवाज उठवत नसल्याचे दिसून येत आहे. याकडे मनपा प्रशासनाचे घोडं कुठे अडले आहे, असा सवाल उपस्थित केल्या जात आहे.

Jalna Veer Savarkar swimming pool condition
KDMC| अनधिकृत होर्डिंग मोजणीसाठी तब्बल २० लाखांचे कंत्राट, केडीएमसीचा अजब कारभार चव्हाट्यावर!

कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेला वीर सावरकर जलतरण तलाव गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत धूळखात पडला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेतील दालनांच्या नूतनीकरणासाठी आणि श्रेयासाठी आगपाखड करणारे लोकप्रतिनिधी या महत्त्वाच्या विषयावर मूग गिळून गप्प असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. हा तलाव केव्हा दुरुस्त होऊन शहरवासीयांना सेवेसाठी उपलब्ध होईल, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

अनास्थेविरोधात आंदोलन करू- मोती तलावाशेजारी वीर सावरकर जलतरण तलावाची निर्मिती करण्यात आलेली आहे. शहरातील एकमेव सार्वजनिक तलाव आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प आज पांढरा हत्ती ठरत आहे. मनपा प्रशासनाने त्वरित तलाव दुरुस्त करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

ॲड. ईश्वर बिल्होरे, हिन्दू महासभा, जालना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news