

two sisters became government officials
देऊळगाव राजा, पुढारी वृत्तसेवा : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या जोरावर जया व पूजा चेके या दोघी बहिणींनी उल्लेखनीय यश संपादन करत सरकारी सेवेत स्थान मिळवले आहे. जया हिची महसूल सहाय्यक (महसूल विभाग) तर पूजा हिची कालवा निरीक्षक पदावर निवड झाल्याने संपूर्ण परिसरात त्यांच्या यशाचे कौतुक होत आहे.
मुळगाव सरंबा (ता. देऊळगाव राजा) येथील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या या दोघी बहिणींनी लहानपणापासूनच शिक्षणाची आवड जोपासली. या दोघींच्या जिद्दीची दखल घेत पांगरी काटे येथील नातेवाईक अंबादास काटे व त्यांच्या पत्नी बेबीताई काटे यांनी त्यांना मोठा आधार दिला. त्यांनी जया व पूजा यांना आपल्या मुलीप्रमाणे सांभाळत त्यांना पांगरी काटे येथे राहण्यासाठी व्यवस्था करून दिली.
तसेच साखरखेर्डा येथील स्पर्धा परीक्षा केंद्रात शिक्षणासाठी पाठवून त्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलला. त्यांच्या या मोलाच्या सहकार्यामुळे दोघींनाही यशाचा मार्ग सुलभ झाला. गणेश चेके व सरला चेके यांचा अभिमान द्विगुणित झाला आहे. काका अंबादास काटे, मावशी बेबीताई काटे तसेच संपूर्ण काटे परिव- ाराचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ग्रामस्थाच्या वतीने या दोंघी बहिणाची सत्कार केला. या चेके बिहिणीच्या यशामुळे गावाचे नाव ही उज्वल झाले आहे. या दोघी बहिणींच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.