Jalna Crime : ९९ हजारांची शिक्षकाची ऑनलाइन फसवणूक; खात्यातून वळती

एपीके फाईल डाउनलोड होताच फोन-पेवर अनोळखी खात्याचा ताबा; तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

जालना : मोबाईलवर अनोळखी एपीके फाईल आपोआप डाउनलोड झाल्यानंतर शिक्षकाच्या बँक खात्यातून तब्बल ९९ हजार रुपये परस्पर वळते झाल्याची घटना शहरातील यशवंतनगर, अंबड रोड परिसरात घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम अन्वये सोमवार, दि. २१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार शिक्षक अनुराग दिगंबर खेडेकर (वय ३६, रा. यशवंतनगर, अंबड रोड, जालना) हे २४ ऑगस्ट रोजी रात्री १०.२१ वाजता घरी असताना त्यांच्या मोबाईलवर एपीके नावाची फाईल डायरेक्ट/आपोआप डाउनलोड झाली. त्यानंतर त्यांच्या फोन-पे खात्यावर मिस्टर ओम देवांगण नावाचे बँक खाते लिंक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Crime News
Chhatrapati Sambhajinagar crime : पोलिस असल्याची बतावणी करून शिक्षकाला अडविले

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या बँक खात्यातील ९९ हजार रुपये काढण्यात आले, तसेच उर्वरित रक्कम दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात आली. घटनेनंतर त्यांनी २६ ऑगस्ट रोजी बँकेत चौकशी केली असता, त्यांच्या खात्यातून संबंधित नावाच्या व्यक्तीला पैसे गेल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने १७ सप्टेंबर रोजी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचे बँक खाते बंद करून प्रकरण तालुका पोलिस ठाण्यात देण्यास सांगितले.

APK फाईल म्हणजे काय?

अनोळखी व्यक्ती किंवा लिंकवरून आलेली एपीके फाईल मोबाईलमध्ये डाउनलोड किंवा इन्स्टॉल करताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. अनोळखी लिंकवर क्लिक करणे, अज्ञात ॲपला परवानगी देणे किंवा बँकिंग व्यवहाराशी संबंधित माहिती शेअर करणे टाळावे., असे आवाहन पोलिस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Crime News
Chhatrapati Sambhajinagar : जिल्ह्यातील ८०० गावं डेंजर झोनमध्ये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news