Chhatrapati Sambhajinagar crime : पोलिस असल्याची बतावणी करून शिक्षकाला अडविले

दोन सोन्याच्या अंगठ्या लंपास
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

वेरूळ : गल्लेबोरगाव येथून कन्नड तालुक्यातील देभेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत दुचाकीवरून जाणाऱ्या शिक्षकाला दोन अनोळखी व्यक्तींनी रस्त्यात अडवून आपण पोलिस असल्याची बतावणी केली. दमदाटी करीत शिक्षकाच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या जबरदस्तीने काढून घेत दोघांनी दुचाकीवरून धूम ठोकली. सोमवारी (दि. २१) सकाळी सव्वानऊच्या सुमारास गल्लेबोरगावजवळ देवगाव रंगारी रस्त्यावर ही घटना घडली.

मनोज भास्कर अमृतकर असे फसवणुकीला बळी पडलेल्या शिक्षकाचे नाव आहे. अमृतकर हे सकाळी ९.१५ वाजता गल्लेबोरगाव येथून देभेगावच्या जिल्हा परिषद शाळेकडे दुचाकीवरून एकटेच निघाले होते. देवगाव रंगारी रस्त्यावर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांची दुचाकी आडवी लावत त्यांना अचानक थांबविले.

Crime News
Chhatrapati Sambhajinagar water crisis : गवळीशिवरा प्रकल्पातील अत्यल्प साठ्यावर डल्ला

आम्ही पोलिसवाले आहोत. या परिसरात चोऱ्या होत आहेत. तुम्ही सोन्याच्या अंगठ्या घालून का फिरता? असे म्हणत या दोघांनी अमृतकर यांच्यावर दबाव आणला. पोलिस असल्याच्या बतावणीमुळे अमृतकर काही समजण्यापूर्वीच दोघांनी त्यांच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या जबरदस्तीने काढून घेतल्या.

अंगठ्या काढून घेतल्यानंतर दोन्ही संशयितांनी क्षणाचाही विलंब न करता दुचाकीवरून घटनास्थळावरून पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शिक्षकाला धक्का बसला. त्यांनी तातडीने खुलताबाद पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेली घटना पोलिसांना सांगितली.

Crime News
Chhatrapati Sambhajinagar theft : एकाच रात्री चार बंद घरे फोडली; सिडको वाळूज महानगरातील घटना

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू केला असून, घटनेच्या मार्गावरील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. शिक्षकाला पोलिस असल्याचे भासवून भरदिवसा अंगठ्या लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news