

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गुरुवारी केलेल्या दोन कारवाईत इंदेवाडी येथील तलाठी व सामाजकल्याण कार्यालयातील महीला लिपिकेस लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून जेरबंद करण्यात आले.
तालुक्यातील इंदेवाडी येथील उलाठी शिवदास प्रेमसिंग पवार यास जमिनीचा फेर दुरुस्ती करण्यासाठी बीस हवारांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्या शहरातील सोरटीनगर येथील कार्यालयात जेरबंद केले. तक्रारदार यांनी इसार पावतीव्दारे घेतलेल्या जमिनीची त्यांना खरेदी करावयाची असल्याने खरेदीसाठी फेर दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्याकरिता तक्रारदार तलाठी शिवदास पवार यांना भेटले असता त्यांनी फेर दुरुस्ती करण्यासाठी भेटले. यावेळी तलाठी पवार यांनी जालना तहसीलदारांचा कलम १५५ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ नुसार आदेश काढावा लागेल.
त्यासाठी बरिष्ठ अधिकाऱ्यांना बीस हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून तक्रारदार यांच्याकडे बीस हजार रुपये लाचेची मागणी केली. तलाठी शिवदास पवार यास पंचासमक्ष बीस हजारांची लाचेची रकम स्वीकारल्याच्या आर पावरून सोरटीनगर येथील त्याच्या खासगी कार्यालयात पकडण्यात आले. दुसन्या घटनेत जालना समाज कार्यालयातील महिला लिपिकेस पाच हजारांची लाच घेताना पकडण्यात आले. तक्रारदारावरील अॅट्रॉसिटी गुन्यातील शासनाकडून आलेले ७५ हजारांचे अनुदान त्याच्या पोस्ट खात्यात जमा करण्यासाठी महिला लिपिकेने पाच हज प्राच्या लाचेची मागणी केली होती. पाच हजारांची लाच स्वीकारताना महिला लिपिकेस पथकाने रंगेहाथ पकडले.
जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून महसूल कर्मचा-यांवर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे ट्रॅप बाढले आहेत, विल्ह्यात लाच मागणाऱ्या अधिकारी व कर्मचान्यांविरुध्द मोठ्या संख्येने नागरिक पुढे येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.