illegal sand mining : महसूल पथकाच्या ताब्यातील ट्रॅक्टर वाळू तस्कराने पळवले

अंबड तालुक्यात अवैध वाळूमाफियांवर मोठी कारवाई
illegal sand mining
शहागड ः कारवाईत जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर . (छाया ः अकबर शेख)
Published on
Updated on

जालना ः वाळू माफियांच्या विरोधात कारवाई करत महसूल पथकाकडून जप्त करण्यात आलेले ट्रक्टर वाळू तस्करांनी बळजबरीने पळवून नेल्याची घटना शुक्रवार, 13 रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास आपेगाव-साष्ट पिंपळगाव परिसरात घडली.

दरम्यान, तहसीलदार विजय चव्हाण यांना आपेगाव-साष्ट पिंपळगाव परिसरातून अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे तहसीलदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी उंबरहंडे व त्यांच्या पथकाला तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले.

illegal sand mining
Jafrabad protest against BDO : जाफराबादेत भीक मांगो आंदोलन; बीडीओंवर कारवाईची मागणी

पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता, करण संकुश घुले (रा. भांबेरी) हा ट्रॅक्टरमधून अवैध वाळू वाहतूक करताना आढळला. पथकाला पाहताच चालकाने ट्रॅक्टरमधील रेती खाली करून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने पाठलाग करून भांबेरी शिवारामध्ये ट्रॅक्टर अडवून ते कायदेशीररीत्या ताब्यात घेतले. पथकाने ट्रॅक्टरचा चेसीस नंबर व ट्रॅक्टरचे फोटो घेतले तसेच पळून जाताना व्हिडिओ घेतले आहे. याठिकाणी एक व्यक्तीचा फोटो देखील घेण्यात आला आहे.

illegal sand mining
illegal abortion case : गर्भपातप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्याला बेड्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news