Jafrabad protest against BDO : जाफराबादेत भीक मांगो आंदोलन; बीडीओंवर कारवाईची मागणी

तहसीलदारांच्या टेबलवर पैसे ठेवून केला निषेध; शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला
Jafrabad protest against BDO
जाफराबाद ः तहसील कार्यालयासमोर अशा प्रकारे हातात कटोरा घेत भीक मांगो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्ते. pudhari photo
Published on
Updated on

जाफराबाद : शेतकऱ्यांच्या कामासाठी गटविकास अधिकारी आणि निलंबित विस्तार अधिकारी या दोघांनी पैसे जमा केल्याच्या अनेक तक्रारी आहेत. मात्र, गटविकास अधिकाऱ्यांवर कुठलीच कारवाई झाली नसल्याच्या निषेधार्थ बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव यांनी जाफराबाद शहरात शुक्रवार, 13 रोजी भीक मांगो आंदोलन केले. यावेळी जमा झालेले 257 रुपये तहसीलदारांच्या टेबलवर ठेवून गटविकास अधिकाऱ्यांचा निषेध नोंदविला.

तहसीलदार अविनाश लोंढे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. ती रक्कम तहसीलदारांनी स्वीकारण्यास नकार दिल्याने आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ती रक्कम जमा करणार असल्याचे सांगितले.

Jafrabad protest against BDO
Majhi Ladki Bahin Yojana: 43825 लाडक्या बहिणींना दिलासा

दिलेल्या निवेदनात गटविकास अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, कामात दिरंगाई, अनियमितता, गैरप्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वेगवेगळ्या कामाचे दर ठरविले असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून गटविकास अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, असा इशारा देण्यात आला आहे.

Jafrabad protest against BDO
illegal abortion case : गर्भपातप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्याला बेड्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news