

Jalna Rotavator rotated on soybean crop
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई शिवारात सोयाबीनची दुबार करूनही सोयाबीन उगवले नसल्याने शेतकऱ्यांनी रोटोव्हेटर फिरवला आहे. या भागातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे. पाऊस पडल्यास तिबार पेरणी करण्याची वेळ शेतकरी यांच्यावर आली आहे.
पिंपळगाव रेणुकाई परिसरामध्ये जून महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. परंतु सुरुवातीपासूनच रिमझिम पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतातील मका, कपाशी, उडीद, सोयाबीन आधी पिकांवर मोठ्या प्रमाणात विविध रोगानी हल्ला केला असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक तान निर्माण झाला आहे.
त्यामध्ये सुरुवातीला काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची उगवनशक्ती न झाल्यामुळे परत सोयाबीन पेरणी केली होती. परंतु काही शेतकऱ्यांनी सोयाबीन उगम शक्ती झाल्यावर ही सोयाबीन शेतात ही पिवळी पडत असल्याने त्यावर रोटावेटर फिरवला आहे. अद्याप पर्यंत मोठा पाऊस झाला नसल्याने शेतकरी हवालदिन झाला आहे. सध्या पिंपळगाव रेणुकाई ही परिसरामध्ये मे महिन्यासाठी उन्हाचा पारा दिसत आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी दिसून येत आहे.