Pradhan Mantri Surya Ghar Yojana : साडेसात हजार ग्राहकांनी बसविले सौर ऊर्जा संच

पीएम-सूर्यघर योजनेस ग्राहकांचा प्रतिसाद, वीज निर्मिती सुरू
Pradhan Mantri Surya Ghar Yojana
साडेसात हजार ग्राहकांनी बसविले सौर ऊर्जा संच pudhari photo
Published on
Updated on

जालना : जालना जिल्ह्यातील 7 हजार 668 ग्राहकांनी 27.01 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संच घराच्या छतावर बसवून वीज निर्मिती सुरू केली आहे.प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेत महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील 38 हजारांहून अधिक ग्राहक विजेबाबत स्वावलंबी झाले आहेत. त्यांच्याकडे घराच्या छतावरील सौर ऊर्जा प्रणालीतून माध्यमातून 133 मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. 78 हजार रुपयांपर्यंत अनुदान असलेल्या या योजनेत वीजहकांना वीजबिल जवळपास शून्य करणे शक्य झाले आहे.

दरमाह तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी केंद्र सरकारने 13 फेब्रुवारी 2024 रोजी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली. घराच्या छतावर 1 ते 3 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रणालीद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे 120 ते 360 युनिट वीज मोफत मिळविण्याची संधी या योजनेत मिळत आहे. त्यामुळे या योजनेस छत्रपती संभाजीनगर परिमंडलात वीजग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Pradhan Mantri Surya Ghar Yojana
Hingoli News : महाशिवरात्रीनिमित्त भगरीच्या सेवनाबाबत काळजी घ्यावी

घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जानिर्मिती संच बसवता यावा यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे तसेच कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यास ग्रामीण ग्राहकांना प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन निधीही देण्यात येणार आहे. याबरोबरच महावितरणकडून 10 किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे तसेच सौर नेटमीटरदेखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.

छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी 30 हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी 60 हजार रुपये आणि तीन किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल 78 हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे.

Pradhan Mantri Surya Ghar Yojana
MLA Bhimrao Keram : तालुक्यातील एकही गाव पेयजलापासून वंचित राहू नये

छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील 38 हजार 121 ग्राहकांनी सूर्यघर योजनेचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यातील 7 हजार 668 ग्राहकांनी 27.01 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संच घराच्या छतावर बसवून वीज निर्मिती सुरू केली आहे. यामुळे महावितरणवरील विजेचा भार कमी झाल्याने उन्हाळ्यातील लोडशेडींग पासुन सुटका मिळणार आहे.

Pradhan Mantri Surya Ghar Yojana
Parbhani Accident : सोनपेठमध्ये टँकरच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

पीएम-सूर्यघर योजनेमुळे घरगुती ग्राहक जवळपास मोफत वीज मिळवत आहेत. शासनाचे अनुदान आणि महावितरणकडून ऑनलाइन सुविधा यामुळे ही योजना सर्वांसाठी सोपी आणि फायदेशीर ठरली आहे. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील ग्राहकांनी योजनेचा लाभ घ्यावा.

पवनकुमार कछोट, मुख्य अभियंता, महावितरण, छत्रपती संभाजीनगर परिमंडल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news