

जामखेड: अंबड तालुक्यातील रोहिलागड फाट्याजवळ धुळे–सोलापूर महामार्गावर रविवारी (दि. २६ ऑक्टोबर) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास दुचाकी आणि ST मध्ये धडकून झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरहून धुळ्याकडे जाणाऱ्या (क्र. MH०९ EX ९६५८) बसने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिला कमल शामराव देवघरे (वय ५५, रा. वरखडी, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) या रस्त्यावर पडून बसखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत महिला आपल्या नातवंडासह प्रवास करत होत्या.
अपघाताची माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. मृतदेह पुढील तपासणीसाठी (शवविच्छेदनासाठी) ग्रामीण रुग्णालय पाचोड येथे पाठवण्यात आला असून, पाचोड पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.