Jalana Crime News | गोंदी पोलिसांकडून ‘रोड रॉबरी’ करणाऱ्या दोघांना पकडले
शहागड प्रतिनिधी : अंबड तालुक्यातील गोंदी पोलीसांकडून राष्ट्रीय महामार्ग 52 वर रॉबरी करणारे दोन आरोपी गजाआड करण्यात आले. पोलीस ठाणे गोंदी हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरती ट्रक चालक लालसिंग अहीरवार हा कंपनीची ट्रक क्र.एम.एच20 डि.ई.4106 यात कंपनीचे सामान घेऊन बिदर राज्य कर्नाटक येथे घेऊन जात होता. असतांना महाकाळा येथे दोन अज्ञात व्यक्तींनी हात करून थांबण्याचा इशारा केला. ट्रक चालकाने ट्रक थांबविल्यानंतर त्या व्यक्तींनी त्याच्या डोळयात काहीतरी टाकून त्यास ट्रक मधून खाली ओढत त्यास मारहाण केली.
याची माहिती मिळताच गोंदी पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी जात ट्रक चालक लालसिंग अहीरवार यास सरकारी दवाखाना शहागड येथे औषध उपचारा करीता दाखल केले. त्यानंतर ट्रक चोरून घेऊन जाणारा बंडू ऊर्फ रामेश्वर भिमराव वाघमारे रा. महाकाळा व समाधान बबन बेंद्रे रा. अंकूशनगर यांना ताब्यात घेउन त्यांच्याकडून गुन्ह्यातील माल ट्रक व कंपनीचा माल असे एकूण 36,33,115 रूचा त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे. त्यांच्या विरूध्द पोलीस ठाणे गोंदी येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणी अबंड न्यायालया समोर आरोपींना हजर करण्यात आलेले असतांना आरोपीस पोलीस कोठडी मिळाली.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक, अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधिक्षक आयूष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक, आशिष खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक किरण हावले, पोलिस जमादार रामदास केंद्रे, पो.का शाकेर सिध्दीकी, चालक वैद्य यांनी केलेली असून असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण हावले हे करीत आहेत.
ट्रकची मूळ किंमत 25 लाख रुपये असून ट्रक छत्रपती संभाजीनगर होऊन बिदर ( कर्नाटक) कडे जात होती. यामध्ये वाशिंग पावडर माल होता. त्याची अंदाजे किंमत 11 लाख रुपये होती ट्रक चालक लालसिंग अहीरवार याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे.

