

शहागड प्रतिनिधी : अबंड तालुक्यातील पाथरवाल बु येथिल बाबची थडी या ठिकाणी अवैध वाळू उपसा व शंभर ब्रास वाळू साठा चोरुन नेल्या प्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तहसिलदार विवेक उढाण यांच्या फिर्यादीवरून गोंदी पोलीस ठाण्यात अवैध गैण खनिज कायदा अन्वये हा गुन्हा नोंद झाला आहे.
भरत लहु घुमरे, ज्ञनेश्वर विक्रम फुलारे, राहुल विक्रम फुलारे, शरद लहु घुमरे, पारस सिताराम काटकर, महेश भिमराव रुचके, पुनित विश्वनाथ भिसले, किशोर बाबासाहेब मगरे, प्रकाश दामोधर ढवळे, विकास अशोक ढवळे, जगन राधाकिशन विटोरे, सतिश बबन विटोरे, मुबीन याकुब शेख, सिध्दार्थ अशोक डेरे , गणेश सुभाष फुलारे , सुनिल गोपीनाथ मगरे सर्व रा. पाथरवाला बु , प्रल्हाद बाबासाहेब राक्षे रा. कुरण अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
गोदावरी नदीपात्रातील अंदाजे 100 ब्रास वाळू चोरीला गेल्या प्रकरणी आणि याठिकाणी तीन लोखंडी केनच्या पुल्या महसूल विभागाने जप्त केल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या आदेशाने पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी राऊत हे करीत आहेत.