

Jalna Political News: BJP emerged as number one in the municipal elections.
सुहास कुलकर्णी
जालना: जालना जिल्ह्यातील तीन नगर पालीकांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन जागांवर विजय मिळवत भाजपाने जिल्ह्यातील राजकारणावर वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले. मागील निवडणुकीत तीन पैकी दोन पालीका काँग्रेसच्या तर एक पालीका भाजपाच्या ताब्यात होती. या निवडणुकीत भाजपाने अंबड पाठोपाठ परतुर पालीका ताब्यात घेत तीन पैकी दोन पालीका ताब्यात घेतल्या आहेत.
जालना जिल्ह्यात परतुर नगर पालीकेची निवडणुक भाजपा व राकों (अजित पवार) या दोन पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली होती.
राकों उमदेबा उमेदवाराच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार तर शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा. डॉ. श्रीकांत शिदे यांनी सभा घेतल्या होत्या. यामुळे परतुर नगर पालीकेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परतुर नगर पालीकेच्या नगराध्यक्ष पदाच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजपाचे आ. बबनराव लोणीकर यांनी काँग्रेसमधुन राकॉमथे आलेले माजी आ. सुरेश कुमार जेथलिया यांना धक्का देत भाजपा उमेदवार निवडुन आणल्याने भाजपासाठी हे यश मोठे समजले जात आहे.
भोकरदन नगर पालीका निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या ताब्यातील नगर पालीका ताब्यात घेण्यासाठी भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आ. संतोष दानवे यांच्यासह राकॉ शरद पवार पक्षाचे माजी आ. चंद्रकांत दानवे यांनी जोरदार प्रयत्न केले. या निवडणुकीत काँग्रेस व भाजपाला धक्का देत रॉकों शरद पवार पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मिर्झा समरीन नाज वसिम वेग या निवडुन आल्या. माजी आ. चंद्रकांत दानवे यांना या विजयाने राजकीय बळ मिळणार आहे.
अंबड नगर पालीकेत भाजपाचे आ. नारायण कुचे यांनी भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणुन देवयानी कुलकर्णी यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्यावतीने श्रध्दा चांगले यांना रॉकों शरद पवार पक्षाच्यावतीने माजी मंत्री राजेश टोपे यांनी उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत देवयानी कुलकर्णी यांनी विजय मिळवत भाजपाचा गड कायम राखला.
जागा वाटपाची चर्चा
जिल्ह्यात तीन नगर पालीका निवडणुकीनंतर भाजपाचे बळ वाढले आहे. जालना महापालीका निवडणुकीत याचा फायदा होण्याची शक्यता आहे. महापालीका निवडणुकीत युतीच्या जागा वाटपासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरुच आहेत. भाजपा व शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते युतीसाठी प्रयत्नशील असले तरी अजुन तोडगा निघाला नसल्याचे पहावयास मिळत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बंद दार-1आड चर्चा होत आहेत.