Sangli Crime : सांगलीत तीन सराईत चोरटे जेरबंद

एलसीबी पथकाची कारवाई; सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त, एक फरार
Arrest
Crime News pudhari photo
Published on
Updated on

सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तीन सराईत चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला. सुदर्शन सुनील यादव (वय 23, रा. ऋतुगंध अपार्टमेंट, वारणाली, सांगली), सार्थक सुनील सुतार (वय 20, रा. रामरहीम कॉलनी, संजयनगर) व मुनीब ऊर्फ बाब्या मुश्ताक भाटकर (वय 21, शामरावनगर, सांगली) या तिघांना अटक करण्यात आली असून मेघनाथ हिरालाम साहू (रा. पालवी हॉटेलजवळ, सांगली) हा पसार झाला आहे.

या चोरट्यांकडून सुमारे तीन लाख तीस हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली. पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांमध्ये डोर्ले, ब्रेसलेट, चेन, वेढण आणि झुबे आदी दागिन्यांचा समावेश आहे.

पोलिस निरीक्षक झाडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणकडील उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्यासह पथकास मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. सराईत गुन्हेगार सार्थक सुतार, सुदर्शन यादव आणि मुनीब भाटकर यांच्याकडे चोरीचे सोन्याचे दागिने आहेत आणि ते दागिने विक्रीकरिता इराणी वस्ती, सह्याद्रीनगर ते शिंदे मळा रेल्वे ब्रीजकडे जाणाऱ्या रस्त्यावर ते येणार आहेत, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी पाळत ठेवून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून आली.

अधिक चौकशीत चौघांनी मिळून विकास कॉलनी, वारणालीमधील बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरी केली होती. हे दागिने विक्री करण्यासाठी आल्याची तसेच उर्वरित दागिने हे मेघनाथ साहू याच्याकडे असल्याची कबुली दिली. तिघांनाही जप्त ऐवजासह पुढील तपासासाठी संजयनगर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले.

ही कारवाई पोलिस निरीक्षक झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पोवार, हवालदार संदीप पाटील, प्रकाश पाटील, अतुल माने, अमोल ऐदाळे, श्रीधर बागडी, ऋषिकेश सदामते, संकेत कानडे, अभिजित माळकर, विनायक सनदी, रोहन घस्ते, सूरज थोरात, सतीश अलदर, करण परदेशी, विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे, इम्रान महालकरी यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news