जालना : परतूर पालिकेच्या स्वच्छता विभागाची तोडफोड

अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल
Jalna Crime News
परतूर पालिकेच्या स्वच्छता विभागाची तोडफोड करण्यात आली
Published on: 
Updated on: 

परतूर : परतूर येथील नगर पालिकेच्या स्वच्छ्ता विभागाच्या कार्यालयाची अज्ञाताकडून तोडफोड करण्यात आली. तसेच कार्यालयाबाहेर उभ्या केलेल्या घंटा गाड्यांच्या काचा फोडून मोठे नुकसानव करण्यात आले. याप्रकरणी बुधवारी (दि.३०) परतूर पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कार्यालयाजवळील घंटा गाड्यांच्या तोडफोडची माहिती मिळताच स्वच्छता विभाग प्रमूख रवि देशपांडे कार्यालयात दाखल झाले. यावेळी कार्यालयाची पाहणी केली असता त्यांना कार्यालयाचा दरवाज्यासह कार्यालयातील साहित्यांची तोडफोड झाल्याचे निदर्शनास आले. यामध्ये एकूण नव्वद हजाराचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी रवि देशपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परतूर पोलिसांत अज्ञात हल्लेखोरांविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक तपास पोहेकॉ अशोक गाढवे हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news