Jalna fever news : वाकडी गावात अज्ञात तापाची साथ; नागरिक फणफणले, आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये संताप

अस्वच्छतेमुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून ग्रामपंचायत प्रशासक नुसते झोपेचे सोंग घेत आहे
Fever
FeverFile Photo
Published on
Updated on

सादिक शेख

आन्वा : भोकरदन तालुक्यातील वाकडी गावात अज्ञात तापाची साथ पसरली असून गावातील प्रत्येक घरात या तापाची लागण झालेले रुग्ण दिसत आहेत. तरी देखील आन्वा प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप नागरिकांतून होत आहेत.

गावभरात अज्ञात तापासह साथीचे आजार पसरले असतानाही आरोग्य विभागाकडून मात्र अद्यापही यावर नियंत्रणासाठी पावले उचण्यात आलेली नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत गावात पसरलेले घाणीचे साम्राज्य, दुषित पाणी पुरवठा व डासांमुळे गावात आजारांनी थैमान घातले आहे.

Fever
Jalna agriculture news : एक लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण

अज्ञात तापाची लागण झालेल्या रुग्णाच्या पेशींचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसत आहे. गावात पुरेशी उपचार सुविधा नसल्यामुळे रुग्ण उपचारासाठी तालुक्याच्या खाजगी रुग्णालयात जात आहेत. खासगी दवाखान्यांमध्ये साथीच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची तोबा गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे. आन्वा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असून वाकडी येथे आरोग्य उपकेंद्र असून मात्र, येथील कर्मचारी या गावाकडे फिरकत नसल्यामुळे गावामध्ये तापाची साथ सुरू आहे.

Fever
Jalna Accident News | पारध-वालसावंगी मार्गावरील दुर्घटना; अखेर कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

भोकरदन तालुक्यातील आन्वासह परिसरात गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरणामुळे झालेली तापमान वाढ अशा संक्रामक वातावरणामुळे सध्या कफजन्य आजाराचा प्रकोप वाढला आहे. सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसत असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना या वातावरणामुळे जास्त त्रास सहन करावा लागत आहे. मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. बदलत्या वातावरणाचा आरोग्याला फटका बसत आहे. सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. घरोघरी सर्दी, खोकला सारख्या आजाराचे रुग्ण दिसत आहेत. ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णाची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.

Fever
Jalna news: वालसांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राची ॲम्बुलन्स फक्त नावालाच..!

गावातील रस्त्यावर पसरत असून रस्त्यावरही जागोजागी खड्डे निर्माण झाले आहे. परीणामी या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असून अस्वच्छतेने कळस गाठल्याने गावात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रार्दुभाव वाढला आहे. गावातील काही गल्लीत तर निट पायी देखील चालता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून ग्रामपंचायत प्रशासक नुसते झोपेचे सोंग घेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news