Jalna News : तलवार बाळगून दहशत निर्माण करणारा युवक जेरबंद

तीन धारदार तलवारी जप्त
Jalna News
Jalna News : तलवार बाळगून दहशत निर्माण करणारा युवक जेरबंदfile photo
Published on
Updated on

Jalna News : The youth who created terror by carrying a sword was jailed

जालना, पुढारी वृत्तसेवाः शहरातील संजयनगर परिसरात तलवार बाळगून लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी अटक केली. सदर युवकाच्या ताब्यातून तीन धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.

Jalna News
Illegal Gas Cylinder : अवैध गॅस सिलिंडर वापराविरोधात मोहीम

शहरातील संजय नगर भागात अनिल किशोर मोरे (रा. बोधलपुरी, ता. घनसावंगी, सध्या संजयनगर, जालना) हा तलवार बाळगून फिरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून सुमारे ५ हजार ३०० रुपये किमतीच्या तीन धारदार व तीक्ष्ण तलवारी जप्त करण्यात आल्या.

Jalna News
Jalna News : उन्हाचा पारा वाढताच कूलर विक्री, दुरुस्तीत वाढ

या प्रकरणी आरोपीविरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी व उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शहरात अवैध शस्त्रामुळे नागरिकांत दहशत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news