Jalna News : रस्त्यासाठी सोरटीनगर रहिवाशांचा रास्ता रोको

महानगरपालिका प्रशासन व पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे
jalna news
Jalna News : रस्त्यासाठी सोरटीनगर रहिवाशांचा रास्ता रोकोfile photo
Published on
Updated on

Jalna News: Sortinagar residents block road for road

जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरातील महानगरपालिका हद्दीत असलेल्या सोरटीनगर, मयुरी पार्क, कृष्णबन सोसायटी या परिसराला जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाले असून, भर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. महानगरपालिका प्रशासनास वेळोवेळी निवेदने देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी सोमवार, दि.६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जालना-छत्रपती संभाजीनगर या मुख्य मार्गावर ठिय्या आंदोलन केले.. दरम्यान, महानगरपालिका प्रशासन, या भागातील नगरसेवक यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

jalna news
Illegal Encroachment : उमरी शहरात नगरपरिषदेची ‘अतिक्रमण हटाओ’मोहीम

शहराच्या मध्यवस्तीत तसेच रत्नप्रभा मोटर्सच्या बाजूला असलेल्या मयुरी पार्क, कृष्णबन सोसायटी व सोरटीनगर या कॉलनीमध्ये जाण्यासाठी येथील रहिवाशांना मागील अनेक वर्षांपासून रस्ता नसल्याने महापालिका प्रशासनाच्या ध्यानात आणून दिले होते. मात्र, नागरिकांच्या या मागणीकडे महापालिका प्रशासनाने कानाडोळा केला. अखेर नागरकांचा संताप अनावर झाल्याने नागरिकांनी दुपारी २ वाजेच्या सुमारास जालना या मागणीकडे महापालिका प्रशासनाने कानाडोळा केला. अखेर नागरकांचा संताप अनावर झाल्याने नागरिकांनी दुपारी २ वाजेच्या सुमारास जालना छत्रपती संभाजीनगर हा मुख्य रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.

ये-जा करण्यासाठी रस्ताच नाही आमचा संपूर्ण परिसरातील नागरिकांकडून महानगरपालिका कर आकारणी करते मात्र येथील रहिवाशांना जाण्या-येण्यासाठी रस्ता देखील उपलब्ध करून देऊ शकत नाही. शहराच्या १० किमी अंतरावर असलेल्या विविध कॉलन्यांमध्ये रस्त्याबरोबर पाण्याची सोय केलेली आहे. मात्र आमच्या परिसरात रस्ता नाही, पाणी नाही आणि विजेची देखील अत्यंत वाईट अवस्था आहे.
कैलास धुमाळ, रहिवाशी मयुरी पार्क
jalna news
Sambhajinagar News : व्हीआयपी मार्गावरील साठे चौकातील खड्डे पुन्हा जैसे थे
चिखल तुडवीत मार्गक्रमण पावसाळ्याचे दिवस असल्याने शाळकरी मुलांना शाळेत सोडणे, आणणे या रस्त्यावरून अत्यंत जिकिरीचे होत आहे. खड्डेमय रस्त्यावर चिखल झाल्याने महिला दुचाकीवरून पडण्याचे प्रमाणही अधिक झाले आहे. रस्ता, वीज, पाणी या बाबीतरी महानगरपालिकेने पुरविणे गरजेचे आहे. रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास पुढील काळात महिलांना सोबत घेऊन महानगरपालिकेच्या दालनात बसणार आहे.
अॅड. अंकिता बाहेती, कृष्णबन सोसायटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news