

Jalna News: Silt removal work begins at Pimpalgaon Renukai
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे नाला व बंधाऱ्यातील गाळ उपसा करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. गाळमिश्रित सुपीक माती शेतात टाकल्याने जमिनीचा पोत सुधारून उत्पादन वाढण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाल्यात साचलेल्या गाळामुळे पाण्याची साठवण क्षमता कमी झाली होती वैयक्तिक जेसीबीच्या साहाय्याने गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले. काढलेला काळा गाळ ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचवला जात आहे.
शेतकरी सांगतात, "या गाळात सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जास्त असते. रासायनिक खतावरील खर्च वाचून जमीन भुसभुशीत होते. कापूस, सोयाबीन व तूर पिकांना याचा मोठा फायदा होतो गाळ टाकल्यास जमिनीची सुपीकता २० टक्क्यांपर्यंत वाढते. सध्या दिवसाला ३० ते ४० जात आहे. खरीप हंगामापूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी खरिपाच्या कामाला गती नाल्याची खोली वाढून पावसाळ्यात पाणी जिरण्यास व भूजल पातळी वाढण्यासही मदत होणार आहे.