Jalna News : हसनाबाद येथील पर्जन्यमापक यंत्र नवीन जागेत स्थलांतरित

पशुवैद्यकीय दवाखान्यातील मोकळ्या जागेत यंत्र बसविले
Jalna News
Jalna News : हसनाबाद येथील पर्जन्यमापक यंत्र नवीन जागेत स्थलांतरितfile photo
Published on
Updated on

Jalna News : Rain gauge in Hasanabad shifted to new place

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील हसनाबाद येथील स्वयंचलित हवामान केंद्र पर्जन्यमापक यंत्र पशुवैद्यकीय दवाखान्यातील मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे. या यत्राचा शेतकरी यांना फायदा होणार आहे.

Jalna News
Jalna News : जिल्ह्यात पावसाची अद्यापही मोठी तूट; ३० जुलैअखेर ४७.९ टक्के पर्जन्यमान

पर्जन्यमाफक यंत्राच्या भोवती ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम व वाढलेली झाडे यामुळे ऊन वारा पाऊस इत्यार्दीच्या बिनचूक नोंदी घेण्यास यंत्राला अडथळा निर्माण होत असल्याने हे यंत्र पशुवैद्यकीय दवाखान्यातील मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे तीन वर्ष पूर्वीपासून करून सतत पाठपुरावा केला होता. तसा अहवाल ही तालुका समितीने दिलेला होता.

Jalna News
Jalna News : पिस्तूल बाळगणारा तरुण जाळ्यात

मात्र तरीही हे यंत्र स्थलांतरित होत नव्हते. २४ जुलै रोजी दैनिक पुढारीने या संबंधातील वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित विभागाला जाग येऊन त्यांनी या शेतकऱ्यांच्या मागणीवर तातडीने कारवाई करत सदरील स्वयंचलित हवामान केंद्र व पर्जन्यमापक यंत्र पशुवैद्यकीय दवाखान्यातील मोकळ्या जागेत स्थलांतरित केले आहे.

पर्जन्यमापक यंत्राच्या अचूक नोंदी घेण्यास यंत्रास अडथळा निर्माण होत होता. पर्जन्यमापक यंत्र स्थलांतरित करून नवीन जागेवर बसवावे या संदर्भात आम्ही तीन वर्षांपूर्वी तक्रार केलेली होती. मात्र स्थलांतर झाले नव्हते. या संदर्भात दैनिक पुढारीने वृत्त प्रकाशित केले. आमची मागणी व दैनिक पुढारीच्या वृत्तपत्राची दखल घेऊन कृषी विभागाने नवीन जागेवर यंत्र आम्हाला बसवून दिले. असल्याचे तक्रारदार शेतकरी समाधान वानखेडे यांनी सांगितले.

हसनाबाद महसूल मंडळ येथील स्वयंचलित हवामान केंद्राजवळ झाडांची वाढ झालेली असल्याने नोंदी अचूक होत नसल्याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार तपासणी करून सदर हवामान केंद्र याची जागा आता बदल करण्यात आलेली आहे. जेणेकरून अचूक नोंदी येईल, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.
अमोल शिंदे, तालुका कृषी अधिकारी, भोकरदन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news