

Jalna News: Rabi sorghum minikits available with 100% subsidy!
जाफराबाद, पुढारी वृत्तसेवाः कमी पर्जन्यमान आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी यमातील कथेत यांनाच्या दिलासा सुधारित रब्बी ज्वारी बियाणे मिनीकिट योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर ज्वारीचे बियाणे मिनीकिट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी नोव्हेंबरपर्यंत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी केले आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य पिकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. ज्वारी हे कमी पाण्यात येणारे पीक असल्याने सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी ते महत्त्वाचा पर्याय ठरू शकते. सुधारित वाणांच्या बियाण्यांचा वापर केल्यास उत्पादनवाढीस मदत होण्याची अपेक्षा आहे.
या योजनेंतर्गत प्रत्येक मिनीकिटमध्ये चार किलो ज्वारीचे बियाणे, प्रक्रिया केलेल्या बियाण्यासाठी जैविक खताची पाकिटे तसेच पीक लागवडीसंबंधी मार्गदर्शन करणारे माहितीपत्रक दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सुधारित बियाण्यांसोबत लागवडीसाठी आवश्यक माहितीही उपलब्ध होणार आहे.
मिनीकिटच्या लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर केली जाणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करावा. उपलब्ध लाभार्थी संख्येनुसार पात्र शेतकऱ्यांची निवड करून नियोजनानुसार मिनीकिटचे वितरण करण्यात येणार आहे.
दुष्काळामुळे अनेक भागांत पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे. अशा परिस्थितीत कमी पाण्यात येणाऱ्या ज्वारी पिकाचे नियोजन करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. ज्वारी हे पौष्टिक तृणधान्य असून अन्नधान्याबरोबरच पशुखाद्यासाठीही त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांसाठीही रब्बी ज्वारीचे पीक महत्त्वाचे आहे.
संपर्क करण्याचे आवाहन
पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या फार्मर पोर्टलवर योजनेची माहिती तपासून आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करावेत. अर्ज भरताना सर्व माहिती अचूक नमून करावी. अधिक माहितीसाठी संबंधित सहायक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी केले.