

Jalna News: Network of 23,811 women's self-help groups in the district
जालना, पुढारी वृत्तसेवाः ग्रामीण व नागरी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी बचत गटांचे जाळे मोलाची भूमिका शासकीय व मध्यवती यंत्रणांच्या बजावत आहे. जालना जिल्ह्यात विविध माध्यमातून २३ हजार ८११ समूह सहाय्यता बचत गट स्थापन झाले असून, महिला सक्षमीकरणाला मोठी गती मिळाली आहे. विशेष म्हणजे यातील १७ हजार ३६७ बचत गटांना सुमारे ७३ टक्केत बँकेशी जोडून खेळत्या भांडवलाचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे, अशी अधिकृत माहिती जिल्हा सांख्यिकी अहवालातून समोर आली आहे.
दरम्यान, बचत गट स्थापनेमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाने बाजी मारली आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात सर्वाधिक ११,५१८ बचत गट स्थापन झाले आहेत. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून शहरात सुमारे ३,६१४ बचत गट स्थापन झाले आहेत. उमेद अभियान सुरू होण्यापूर्वी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून दारिद्र्यरेषेखाली असलेल्या महिलांचे (सुवर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना) एकूण ३,५२४ बचत गट स्थापन करण्यात आले होते. शिवाय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २,८५२ तर महिला आर्थिक विकास महामंडळच्या माध्यमातून जिल्हाभरात सुमारे २,३०३ बचत गट स्थापन करण्यात आले आहे.
केवळ बचत गट स्थापन न करता त्यांना प्रत्यक्ष आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी बँक जोडणी व फिरता निधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. जिल्हभरातील एकूण १७,३६७ गटांना खेळत्या भांडवलाचा लाभ मिळाला आहे. यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत १४,९५६ आणि नागरी भागातील राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियानांतर्गत असलेल्या २,४११ बचत गटांचा समावेश आहे.
तालुका निहाय स्वयंस सहाय्यता बचतगटांचा विचार केल्यास जालना तालुक्याने ५,७७८ बचत गटांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. जालना तालुक्यात नागरी २,२७४ आणि ग्रामीण १,८०८ दोन्ही क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गट स्थापन झाले आहेत. तर द्वितीय क्रमांक हा अंबड तालुका ३,४४७ बचत गट स्थापन झाले असून, सुमारे २,२१८ गटांना बैंक जोडणी झाली आहे. त्यापाठोपाठ भोकरदन तालुक्याचा तृतीय क्रमांक आहे. या तालुक्यात ३,४०० बचत गट तर ३,०६६ गटांना जोडणी करण्यात आली आहे. इतर तालुक्यांमध्ये मंठा (२,७३६), परतूर (२,५८२), घनसावंगी (२,२३१), जाफ्राबाद (१,९९२) आणि बदनापूर तालुका (१,६४५) यांचा क्रमांक लागतो-
जिल्हाभरातील बचतगटांचा आलेख
सर्वाधिक बचत गट असलेला तालुका: जालना ५,७७८ सर्वाधिक बैंक जोडणी झालेला तालुका: जालना ४,१६६, भोकरदन ३,०६६ बैंक जोडणीची सर्वाधिक टक्केवारीः भोकरदन तालुका २०.१७ टक्का, गटांना खेळते भांडवल प्राप्त माविमचीची कामगिरीः परतूर ५८१ आणि मंठा ५९९ तालुक्यात 'माविम'च्या माध्यमातून सर्वाधिक बचत गटांचे संघटन.