Jalna News : टवाळखोरांनो, मुलींना छेडाल तर याद राखा

मोती बाग चौपाटी परिसरात दामिनी पथकाची कारवाई
Jalna News
Jalna News : टवाळखोरांनो, मुलींना छेडाल तर याद राखाfile photo
Published on
Updated on

Jalna News: Loafers, beware—if you harass girls, you will face the consequences

जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरातील महिला व तरुणींच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाने आपली कारवाई अधिक तीव्र केली असून मोती बाग चौपाटी व बसस्थानक परिसरात टवाळखोरी करणाऱ्या युवकांवर धडक कारवाई करण्यात आली. यावेळी संबंधित युवकांना उठाबश्या काढण्यास भाग पाडून समज देण्यात आली.

Jalna News
Nanded Crime News : अंध महिलेचे मंगळसूत्र पळवणारी महिला अवघ्या दोन तासात जेरबंद

पोलिस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकप्रमुख गणेश शिंदे तसेच महिला पोलिस कर्मचारी सिंधू खर्जुले, वंदना साळवे आणि जयश्री म्हसके यांनी ही कारवाई केली. महिला सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी दामिनी पथकाकडून शाळा वमहाविद्यालयांमध्येही भेटी देण्यात येत आहेत.

Jalna News
Sambhajinagar Crime News : वाळूज ठाण्यासमोर हायव्होल्टेज ड्रामा

विद्यार्थिनींना त्यांच्या हक्कांबाबत माहिती देत छेडछाड अथवा त्रास होत असल्यास तातडीने तक्रार करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दामिनी पथक महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी कार्यकरत आहे. तरुणी तसेच महिलांची कुणी छेड काढत असल्यास किंवा त्रास देत असल्यास दामिनी पथकाच्या हेल्पलाईन क्रमांक 9822171918 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news