Jalna News : बदनापूर तहसील कार्यालयासमोर शिवसेनेची काळी दिवाळी साजरी

सरकारने २५ हजार रुपये अग्रीम मदत द्यावी तसेच शेतकर्यांना सरकारने दुष्काळी अनुदान हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
jalna news
बदनापूर तहसील कार्यालयासमोर शिवसेनेची काळी दिवाळी साजरीfile photo
Published on: 
Updated on: 

Jalna News : Black Diwali celebration of Shiv Sena in front of Badnapur tehsil office

जालना, पुढारी वृत्तसेवाः शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बदनापूर तहसील कार्यालयासमोर चुलीवर बेसन भाकर बनवत व तहसील प्रांगणात काळी फित लावून काळी दिवाळी साजरी करण्यात आली. सरकारने दिलेल्या अग्रीमच्या पाच हजारांच्या मदतीमध्ये अशीच दिवाळी साजरी होऊ शकते, त्यामुळे सरकारने २५ हजार रुपये अग्रीम मदत द्यावी तसेच शेतकर्यांना सरकारने दुष्काळी अनुदान हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

jalna news
Auto market : दीपावलीच्या मुहूर्तावर वाहन बाजारात तेजी !

यावेळी शिवसेना पदाधिकार्यांनी तहसिल आवारात चुल मांडून चुलीवर बेसन भाकरी तयार केल्या. तसेच संपुर्ण भिंती काळ्या करण्यात आल्या होत्या. यामुळे प्रशासन हादरुन गेले होते. यावेळी जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव, उपजिल्हाप्रमुख भगवानराव कदम, किसानसेना जिल्हा संघटक भानुदास घुगे, तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण महिला आघाडी जिल्हाप्रमुख रूपमताई घुगे, युवासेना उपजिल्हाप्रमुख कारभारी म्हसलेकर,

युवासेना तालुकाप्रमुख काकासाहेब ढाकणे, उपतालुकाप्रमुख फैजान मिर्झा, रामेश्वर फंड, संजय जाधव, राहुल जर्हारड, अंकुश पवार, बळीराम कोल्हे, गुलजार बेग, फैजान पटेल, लक्ष्मण साळवे, राम म्हसलेकर, गजानन लहाने, ज्ञानेश्वर सौदागर सह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव म्हणाले की, जालना जिल्ह्यातील शेतकरी यंदा भीषण दुष्काळाच्या संकटात सापडला असून, हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने शेतकर्या ची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.

jalna news
Jalna Water Shortage : सेलूद येथील धामणा धरणात केवळ मृतसाठा

अशा परिस्थितीत शासनाने दिवाळीसाठी केवळ पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जाहीर करून शेतकर्यांपच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे बदनापूर तहसील कार्यालयात बेसन, भाकर, ठेचा आणि चटणी खाऊन प्रतिकात्मक काळी दिवाळी साजरी करत शासनाचा निषेध नोंदवण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.