Jalna News : ढगाळ वातावरणानंतर थंडीची जिल्ह्यात एन्ट्री

त्या आठवड्यात जालना जिल्ह्याच्या हवामानात मोठे बदल होणार आहे.
Jalna News
Jalna News : ढगाळ वातावरणानंतर थंडीची जिल्ह्यात एन्ट्रीfile photo
Published on: 
Updated on: 

Cold weather enters the district after cloudy weather

जालना, पुढारी वृत्तसेवा : येत्या आठवड्यात जालना जिल्ह्याच्या हवामानात मोठे बदल होणार असून, नागरिकांना एकाच आठवड्यात दोन वेगवेगळ्या ऋतूंचा अनुभव येणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यात सुरुवातीला ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता आहे, तर आठवड्याच्या उत्तरार्धात थंडीचा कडाका वाढणार आहे.

Jalna News
Jalna Farmers Financial Crisis : अंबड तालुक्यात सव्वा लाख शेतकरी दिवाळीपूर्वी आगाऊ मदतीच्या प्रतीक्षेत

या आठवड्यात जालन्याचे कमाल तापमान ३०° से ते ३३०° से आणि किमान तापमान १९०से ते २३० से दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्याच्या काही भागांत ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची किंवा मेघगर्जनेची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीच्या ऐन दिवसांत नागरिकांना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवावा लागू शकतो. मात्र, हा बदल तात्पुरता असून ३ नोव्हेंबरपासून आकाश पुन्हा स्वच्छ होईल.

Jalna News
Jalna News : नापिकीचा फटका, कर्जाचा विळखा; ४४ शेतकरी कुटुंबे मदतीविना !

४ नोव्हेंबरनंतर हवामान पूर्णपणे कोरडे आणि स्वच्छ होणार असून रात्रीच्या तापमानात लक्षणीय घट होईल. किमान तापमान २०°C च्या खाली जाण्याची शक्यता असल्याने नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात जालनेकरांना गुलाबी थंडीचा अनुभव मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.