Jalna Municipal Corporation auction : आर्थिक दिलासा : जाहीर लिलावातून मनपाला ८५.७५ लाखांचे उत्पन्न

महसुलातून शहरातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्याचा निर्धार
Jalna Municipal Corporation auction
जालना शहर महानगरपालिकाpudhari photo
Published on
Updated on

जालना : जालना शहर महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागांतर्गत येणाऱ्या विविध दैनंदिन बाजार, आठवडी बाजार तसेच इतर व्यावसायिक मक्त्यांचा जाहीर लिलाव शुक्रवारी महापालिका आयुक्तांच्या दालनात पार पडला. या लिलाव प्रक्रियेला बोलीधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने महानगरपालिकेला तब्बल ८५ लाख ७५ हजार २८८ रुपयांचा विक्रमी महसूल प्राप्त झाला आहे.

या लिलावात महात्मा फुले मार्केटमधील दैनंदिन बाजार व गणेशमूर्ती विक्री मक्ता, नूतन वसाहत दैनंदिन बाजार, रविवार ते शुक्रवार आठवडी बाजार, दुर्गादेवी नवरात्र महोत्सवासाठी जमीन भाडे वसुली, तसेच छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील मासेमारी आणि इतर व्यावसायिक मक्त्यांसाठी बोली प्रक्रिया पार पडली. एकूण ११ मक्त्यांच्या लिलावातून मनपाच्या उत्पन्नात भरीव वाढ झाली आहे.

Jalna Municipal Corporation auction
Nashik agri market-नाशिकमध्ये उभारणार कृषिमाल विक्री केंद्र व शीतगृह

महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण लिलाव प्रक्रिया शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. प्राप्त झालेला महसूल शहरातील रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत नागरी सुविधांच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे. यावेळी उपायुक्त नंदा गायकवाड, उपायुक्त त्र्यंबक कांबळे, मालमत्ता अधीक्षक राजेश चंदनशिवे, सभा लिपिक बंडू चव्हाण, मालमत्ता लिपिक गजानन सोनवणे आदी उपस्‍थित होते.

Jalna Municipal Corporation auction
Sinnar Land Acquisition Highway | शेतकऱ्यांच्या समस्या सुटेपर्यंत महामार्गाचे काम रोखणार! आमदार माणिकराव कोकाटे यांचा सिन्नरमध्ये पवित्रा

नागरी सुविधांच्या विकासासाठी वापर या लिलाव प्रक्रियेतून महापालिकेला ८५ लाख ७५ हजार २८८ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. या महसुलातून लोकोपयोगी कामे हाती घेतली जाणार आहे. प्राप्त झालेला महसूल शहरातील रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत नागरी सुविधांच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे.

अंजल शर्मा, आयुक्त, मनपा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news