Washim Crime | वाशीमजवळील पाटील ढाब्यावर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडाकेबाज छापा

18 आरोपी जेरबंद, 7 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांच्या कारवाईचे शहरात स्वागत
Washim Crime | वाशीमजवळील पाटील ढाब्यावर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडाकेबाज छापा
Washim Crime | वाशीमजवळील पाटील ढाब्यावर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडाकेबाज छापा
Published on
Updated on

वाशीमः वाशीम शहरा लगत पाटील ढाबा येथे सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील,यांच्यासह पोलीसांनी मोठी धडक कारवाई करत 18 आरोपींना रंगेहात पकडले. या कारवाईत तब्बल 7 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या धाडसी कारवाई मुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

या अवैध जुगार अड्डयावर १. नाझीम खाँ अजीज खाँ पठाण वय ४२ वर्ष रा. सोपीनगर इदगाह नगर वाशिम २. गणेश मोहनराव हेंद्रे वय ५१ वर्ष रा.टिळक चौक वाशिम, ३. सिध्देश्वर पुंडलीक लोनसुने वय ५२ वर्ष रा.दत्त नगर अकोला रोड वाशिम, ४. गजानन किसन चौधरी वय ३८ वर्ष रा. लाखाळा वाशिम, ५. शेख खाजा शेख हनीफ, ६. देवीदास वानखेडे रा.चांमुडा देवी वाशिम, ७. लक्ष्मण रा.काळेफाईल, ८. शेख इकबाल रा. गोटे कॉलेज जवळ वाशिम, ९. दत्ता लताड मॅनेजर, १०. युवराज फॅन्सी बॅग्लर्स वाला, ११. शेख अशपाक खाजा नातेवाईक, १२. शामा सुरवसे पाटील ढाब्यावरील नोकर, १३. समशेर खाँ आरेफ खॉ पठाण रा. बिलाल नगर वाशिम, १४. सोनु खाँ फिरोज खाँ पठाण रा. बिलाल नगर वाशिम, १५. मुजाहिद खाँ आसिफ खी बिलाल नगर वाशिम, १६. शेख जावेद शेख लखन रा.गोपाल टॉकिज मागे वाशिम, १७. जॉन रा. अकोला नाका वाशिम, १८ अददू रा. बुराहणपुरा वाशिम. यांच्यावर कारवाई करण्यात आली. या आरोपींकडून नगदी ३२,६००/- रुपये, जुगार साहित्य, मोबाईल, मो.सा असा एकुण ७,७५,०००/- रु चा मुददेमाल जप्त करण्यात आला.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली. अचानक टाकलेल्या छाप्यात जुगार खेळणारे आरोपी पळण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, मोबाईल फोन व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या धाडसी कारवाईमुळे शहरातील अवैध जुगार व्यवसायाला मोठा धक्का बसला असून, गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये खळबळ उडाली आहे. संबंधित 18 आरोपींविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, अशाच प्रकारे अवैध धंद्यांवर कडक कारवाई सुरू ठेवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news