Jalna Merchant Cooperative Bank scam : बँक घोटाळा; मुख्य आरोपींसह तिघे अटकेत

आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
Jalna Merchant Cooperative Bank scam
बँक घोटाळा; मुख्य आरोपींसह तिघे अटकेतpudhari photo
Published on
Updated on

जालना : शहरातील जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपींसह तिघांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रामेश्वर जाधव, ज्ञानेश्वर जाधव आणि सुधाकर ठोंबे यांचा समावेश आहे.

या प्रकरणात वेअरहाऊसच्या नावावर 177 बनावट खातेदार तयार करून तब्बल 23 कोटी 33 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता ( बीएनएस 2023) अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Jalna Merchant Cooperative Bank scam
Jalgaon theft news | हाताचा चावा घेत चोरट्यांनी फिल्मी' स्टाईलने लाखांचं मंगळसूत्र केलं लंपास

तपासादरम्यान या घोटाळ्याचा सूत्रधार रायचंद ऊर्फ सुरेश कुंभार असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याच्यासह काही अन्य आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून बँकेतून मोठ्या प्रमाणात रक्कम अपहार केल्याचे समोर आले आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत बुलढाणा जिल्ह्यातून रामेश्वर जाधव व ज्ञानेश्वर जाधव यांना अटक केली, तर सुधाकर ठोंबे याला जालन्यातून ताब्यात घेण्यात आले. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता, त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता तपास अधिक सखोल करण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.

Jalna Merchant Cooperative Bank scam
Chandrapur Crime | चंद्रपुरात अवैध ६३ जनावरांची वाहतूक: ५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

आर्थिक घोटाळ्यामुळे जालना शहरात खळबळ उडाली असून, बँक व्यवहारांवरील विश्वासावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news